सातारा

स्विकृत पदासाठी साता-यात निवडणुक जाहीर

गिरीश चव्हाण

सातारा : पालिकेचे स्वीकृत नगरसेवक विकास गोसावी यांनी राजीनामा दिल्याने रिक्‍त झालेल्या जागेवर नव्याने निवड होण्यासाठीचा कार्यक्रम शनिवारी (ता.10) नगराध्यक्षा माधवी कदम यांनी जाहीर केला. यानुसार स्वीकृत नगरसेवकाची निवड ता. 21 रोजी दुपारी तीन वाजता होणार आहे.
 
पालिकेत सातारा विकास आघाडीचे दोन, नगर विकास आघाडी आणि भाजपचा प्रत्येकी एक स्वीकृत नगरसेवक नियुक्‍त आहे. स्वीकृत नगरसेवकपदाचा कालावधी पूर्ण झाल्याने भाजपच्या विकास गोसावी यांनी राजीनामा दिला होता. त्यांनी राजीनामा दिल्याने नवीन निवडीसाठीचा कार्यक्रम कधी जाहीर होणार, याकडे सातारकरांच्या नजरा लागून होत्या.

''राजे सर्व जनतेचे, ते कुणा एकाचे नाही, मग तलवारी कुणावर काढणार?'' - भुजबळ 

भाजपच्या नगरसेवकाने राजीनामा दिल्यानंतर सातारा विकास आघाडीतही हालचाली सुरू झाल्या आहेत. साविआकडून या वेळी स्वीकृतपदी कोणाला संधी द्यायची, याचा निर्णय खासदार उदयनराजेंच्या दरबारी प्रलंबित आहे. भाजपच्या एका नगरसेवकाने राजीनामा दिल्यानंतर नवीन निवडीसाठीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी, तसेच प्रांताधिकारी कार्यालयाने सातारा पालिकेस दिला होता.

यानुसार शनिवारी (ता. 10) नगराध्यक्षा माधवी कदम यांनी हा कार्यक्रम जाहीर केला. स्वीकृत नगरसेवकपदासाठी इच्छुक असणाऱ्यांनी ता. 20 रोजी दुपारपर्यंत अर्ज दाखल करणे आवश्‍यक आहे. दाखल अर्जांची ता. 21 रोजी सकाळी 11 वाजता छाननी होणार असून, त्यानंतर दुपारी तीन वाजता नवीन निवडी ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहेत.

सातारा : राजकारणात साधणार उदयनराजे बेरजेचे गणित

सातारा पालिका : साविआत हालचाली,नविआ शांत; भाजपात संधी

भाजपमुळे वाढणार साविआची डोकेदुखी; मनसुब्यांवर बोळा फिरण्याची शक्‍यता!

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Series: अजित आगरकर OUT, न्यूझीलंड दौऱ्यासाठी रोहित शर्माचा खास 'माणूस' निवडणार संघ; मीटिंग कधी होणार?

'दृश्यम ३' मध्ये गायतोंडेची दहशत दिसलीच नाही' म्हणणाऱ्या मराठी अभिनेत्याला नेटकऱ्यांनी सुनावलं; म्हणाले- तुम्ही लोक

Navi Mumbai: नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद, सात विभागांवर परिणाम; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Dapoli Projects,: तीन प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा; दाभोळ अणुऊर्जा, चिखलगाव बॉक्साइट व देवके नवेनगर प्रकल्प रद्द करण्याची मागणी!

Latest Marathi News Live Update : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुण्याच्या दिशेने रवाना

SCROLL FOR NEXT