सातारा

थकबाकीदारांनाे! दुकानगाळे सील करण्याची माेहीम सुरुच राहणार; सातारा पालिकेचा इशारा

गिरीश चव्हाण

सातारा : सातारा पालिकेने थकीत भाड्यापोटी सहा दुकानगाळे सील करत त्याबाबतच्या नोटिसा संबंधित गाळेधारकास दिल्या. पालिकेच्या या कारवाईमुळे भाडेकरूंचे धाबे दणाणले असून सायंकाळपर्यंत एकाने थकबाकी भरत गाळ्याचा ताबा घेतला. सातारा पालिकेच्या मालकीच्या जागांमध्ये व्यापारी संकुले उभारली आहेत. या व्यापारी संकुलामधील सुमारे 318 गाळे दीर्घ मुदतीच्या कराराने अनेकांनी पालिकेकडून भाडे तत्त्वावर घेतले आहेत. या गाळ्यांचे दरवर्षीच्या करारानुसार भाडे गाळेधारकास पालिकेत जमा करावे लागते. तरीही अनेकांनी वर्षांनुवर्षे गाळ्यांचे भाडे पालिकेत जमा केले नाही. त्यामुळे पालिकेने अशा गाळेधारकांविरोधात कारवाई हाती घेतली होती. त्यानुसार जास्त थकबाकी असणाऱ्या 63 गाळेधारकांना 15 दिवसांपूर्वी थकीत भाडे पालिकेत जमा करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.

नोटिसा बजावूनही भाडे न भरल्याने पालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाने गाळे जप्तीची मोहीम हाती घेतली. प्रविता शेंडगे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पालिकेच्या मालकीचे सहा गाळे सील केले. सायंकाळपर्यंत ही मोहीम सुरूच होती. मोहिमेदरम्यान जप्त केलेल्या गाळ्यांचे थकीत भाडे भरत एका गाळेधारकाने गाळ्याचा ताबा पुन्हा घेतला. येत्या काही दिवसांत पालिकेच्या वतीने सर्वच थकबाकीदारांचे गाळे सील करण्यात येणार असल्याची माहिती प्रविता शेंडगे यांनी दिली. 

सातारा नगरपालिकेच्या पथकांकडून दिवसात फक्त 50 लाखांची वसुली 

सातारा पालिकेच्या तिजोरीत वसुलीच्या शेवटच्या दिवशी फक्‍त 50 लाखांची भर पडली. या 50 लाखांमुळे आतापर्यंत पालिकेस 44 कोटींपैकी 14 कोटी 50 लाखांची थकबाकी वसूल करण्यात यश आले. सातारा शहरात असणाऱ्या 32 हजार 108 मिळकतधारकांकडून पालिकेस 44 कोटी रुपये करापोटी येणे बाकी आहे. ही येणे बाकी वसूल करण्यासाठी पालिकेची पथके गेली महिनाभर कार्यरत होती. कोरोना, लॉकडाउन व इतर कारणांमुळे नागरिकांकडून येणे बाकी वसूल करण्यात पालिकेच्या पथकांना अडचणी येत होत्या.

मंत्री शिंदेंनी सोडविला सातारकरांची तहान भागवणाऱ्या कासचा प्रश्न; खासदार उदयनराजेंच्या प्रयत्नांना यश

या पथकांनी एका महिन्यात 44 कोटींपैकी 14 कोटी वसूल केले होते. वसुलीचा अखरेच्या दिवशी आज फक्‍त 50 लाख वसूल करणे शक्‍य झाले. अपेक्षित येण्यापैकी 67 टक्केच वसुली झाल्याने पालिकेच्या तिजोरीवर आगामी काळात मोठ्या प्रमाणात ताण येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT