सातारा

उदयनराजे सर्मथक बाळासाहेबांच्या नगरसेवकपदाच्या अर्जास आव्हान

गिरीश चव्हाण

सातारा : सातारा पालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी सातारा विकास आघाडीकडून बाळासाहेब ढेकणे यांचा एकमेव अर्ज प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांच्याकडे दाखल झाला. ढेकणे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध हाेणार हे स्पष्ट झाले आहे. केवळ त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा आज (मंगळवार) होणाऱ्या विशेष सभेत होणार आहे.
 
पालिकेच्या 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत सातारा विकास आघाडीने 22, नगर विकास आघाडीने 12 तर भारतीय जनता पक्षाने सहा जागा मिळवल्या होत्या. निवडणुकीत मिळालेल्या जागांनुसार साविआच्या वाट्याला दाेन, नविआ आणि भाजपच्या वाट्याला प्रत्येकी एक-एक स्वीकृत नगरसेवकाची जागा आली. जुलै 2020 मध्ये मुदत संपल्याने साविआच्या कोट्यातील स्वीकृत नगरसेवक प्रशांत आहेरराव यांनी खासदार उदयनराजेंच्या आदेशानुसार राजीनामा दिला होता. आहेरराव यांच्या राजीनाम्यामुळे रिक्‍त झालेल्या पदाच्या निवडीचा कार्यक्रम प्रांताधिकारी मुल्ला यांनी जाहीर केला होता. त्यानुसार सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास करंजे येथील बाळासाहेब ढेकणे यांनी नगरसेवक ऍड. दत्ता बनकर यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज प्रांताधिकारी मुल्ला यांच्याकडे सादर केला. ढेकणे यांच्या बिनविरोध निवडीची औपचारिक घोषणा आज (मंगळवार) दुपारी तीन वाजता नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या विशेष सभेत हाेईल.

कऱ्हाड : शासकीय 'अभियांत्रिकी'च्या प्रगतीस 25 लाखांचे पॅकेज 

दरम्यान सातारा पालिकेत आज (मंगळवार) होणाऱ्या स्वीकृत नगरसेवक निवडीच्या सभेस शहर सुधार समितीच्या वतीने आक्षेप घेण्यात आला आहे. याबाबतचे पत्र शहर सुधार समितीच्या वतीने कॉ. अस्लम तडसरकर, विक्रांत पवार यांनी राज्य निवडणूक आयोगासह सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहे.

उदयनराजेंचे मित्रप्रेम; बाळासाहेबांच्या पाठीशी राहिले ठाम

राष्ट्रवादीच्या 'एकला चलो रे' च्या भूमिकेने वाईतील कॉंग्रेस आक्रमक  

या पत्रात उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या व्यक्‍तीचे नाव पालिका मतदार यादीत आहे का, याची खात्री झाल्याशिवाय अर्ज स्वीकारू नये, अर्ज दाखल करणाऱ्याच्या वैधता सभागृह प्रतिनिधित्व कायद्यानुसार तपासावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आम्ही केलेल्या मागणीनुसार आक्षेपाची दखल घेण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरू चेन्नई प्लेऑफच्या एका जागेसाठी भिडणार, पण पावसाचे अंदाज काय?

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींनी रायबरेली, अमेठीत प्रचार करणे टाळले, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT