सातारा

पालिका उपाध्यक्षाची निवड गुरुवारी; उदयनराजेंच्या भूमिकेकडे लक्ष

सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा पालिकेच्या उपाध्यक्ष निवडीसाठी नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता. पाच) दुपारी साडे बारा वाजता  व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे विशेष सभा बोलावण्यात आली आहे. उपाध्यक्षपदासाठी सकाळी दहा वाजल्यापासून नामनिर्देशपत्र स्वीकारले जाणार आहे. उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने स्वीकृत नगरसेवकपदाच्या निवडीचीही उत्सुकता इच्छुकांना लागली आहे.

नगरसेवक किशोर शिंदे यांनी राजीनामा दिल्यामुळे उपाध्यक्षपद रिक्‍त झाले आहे. सातारा पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सातारा विकास आघाडीने राजकीय डावपेच आखत शहरातील त्या त्या भागात ताकद वाढवण्याच्या द‍ृष्टीने कार्यकर्त्यांना संधी दिली. खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली साविआची बैठक झाली होती. त्यावेळी उपाध्यक्षपदी कुणाला संधी द्यायची, यावर चर्चा झाली होती.

विकासकामांतून निवडणुकीची नांदी; उदयनराजेंची रणनितीस प्रारंभ

किशोर शिंदे यांनी नगराध्यक्षा माधवी कदम यांच्याकडे आठ दिवसांपूर्वी राजीनामा दिला. त्यामुळे साविआमध्ये इच्छुकांची संख्या वाढली. त्यामध्ये माजी पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांचाही समोवश होता. उपाध्यक्ष निवडीत मनोज शेंडे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा कदम यांनी उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या गुरुवारी (ता.5) दुपारी साडे बारा वाजता वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ही निवड प्रक्रिया पार पडणार आहे. मुख्याधिकारी अभिजीत बापट हे नामनिर्देशपत्र स्वीकारणार आहेत.

उदयनराजेंच्या सातारा विकासला भाजपचा ठेंगा! 

पीठासीन अधिकारी नामनिर्देशपत्राची छाननी करणार आहेत. या निवडणुकीत एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास मत देण्यास इच्छुक असलेला प्रत्येक सदस्य सिसको बेबबॅक्स प्रणालीद्वारे मत देईल व त्याची कार्यवृत्तात नोंद घेवून उपाध्यक्ष निवडीचे कामकाज पूर्ण केले जाणार आहे. थेट निवडून आलेले नगराध्यक्ष हे नगरसेवक असल्याने ते मतदान करु शकतात. या निवडणुकीत समसमान मते पडल्यास नगराध्यक्षांना निर्णायक मत (कास्टींग व्होट) देण्याचा अधिकार आहे.

राजे.. पोटापाण्यासाठी आलेल्यांची परवड थांबवा

उपाध्यक्ष तसेच स्वीकृत नगरसेवक निवडीचा कार्यक्रम सोबतच जाहीर होईल असे मानले जात हाेते. परंतु तसे न झाल्यामुळे स्वीकृत नगरसेवक निवडीचा कार्यक्रम काही दिवसांत स्वतंत्रपणे जाहीर हाेईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT