satara mohim 
सातारा

सातारा जिल्हावासीयांचे कोरोनादूतास उत्तम सहकार्य

उमेश बांबरे

सातारा : 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर व 14 ते 24 ऑक्टोबर या कालावधीत दोन टप्प्यात राबविण्यात येणार असून पहिला टप्पा सुरु झाला आहे. प्रत्येक गावोगावी जाऊन तपासणी केली जात आहे. लोकांचे उत्तम सहकार्य लाभत आहे.

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील काळज, खंडाळा तालुक्यातील कोपर्डे व पाडळी, पाटण तालुक्यातील कुठरे येथे आरोग्य सेविका, स्वयंसेवक व आशा कर्मचारी यांनी गृहभेटी देवून माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहीमेची सुरुवात केली.

मोहिमेंतर्गत  जिल्ह्यातील सहा लाख 80 हजार कुटुंबांना पथक भेट देणार आहेत. या टीममध्ये तीन जणांचा समावेश असून यांना कोरोना दूत म्हणून संबोधण्यात येणार आहे. या पथकाकडून विचारण्यात येणारे प्रश्न हे सोपे असणार असून त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची खरी उत्तरे द्यावी.

कोरोना संसर्गाबाबत जनाजागृती व्हावी हा या मोहिमेचा उद्देश आहे. यामध्ये मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर करणे यांची जनजागृती करण्यात येणार आहे तरी नागरिकांनी मास्कचा वापर करणे, हात वेळोवेळी धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे याची सवय लावावी.

या मोहिमेंतर्गत कोरोनाचा संसर्ग होवू नये म्हणून काय काळजी घ्यावी, होम आयसोलेशनमध्ये आहेत त्यांनी काय काळजी घ्यावी तसेच कोरोनातून बरे झाल्यानंतर काय काळजी घ्यावी याची सर्व माहिती मोहिमेंतर्गत सांगण्यात येणार आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT