लोणंद नगरपंचायतीत
लोणंद नगरपंचायतीत  sakal
सातारा

सातारा : लोणंद नगरपंचायतीत नियमबाह्य कामे

सकाळ वृत्तसेवा

लोणंद : लोणंद नगरपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांकडून विकासकामांबाबत पक्षपातीपणा केला जात असून विरोधी सदस्यांचे म्हणणे सर्वसाधारण सभेमधील कार्यवृत्तामध्ये घेण्यात येत नसल्याची तक्रार लोणंद नगरपंचायतीच्या काँग्रेस, भाजप व अपक्ष विरोधी गटाच्या सात नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली असून नियमबाह्य काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

लोणंद नगरपंचायतीचे नगरसेवक आनंदराव शेळके-पाटील, दीपाली संदीप शेळके, दीपाली नीलेश शेळके, आसिया बागवान, राजश्री रवींद्र शेळके, ज्योती डोणीकर, प्रवीण व्हावळ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लोणंद नगरपंचायत येथे सत्ताधारी पक्ष व मुख्याधिकारी हे संगनमताने नियमबाह्य कामे करीत आहेत. सर्वसाधारण सभा तसेच विशेष सभा यामध्ये विरोधी बाकावरील सदस्यांच्या सूचना तथा आक्षेप यांची नोंद कार्यवृत्तामध्ये केली जात नाही, सर्वसाधारण सभेमध्ये घेतलेल्या विकास कामांबाबत पूर्णपणे पक्षपातीपणा करणे व विरोधी पक्षाने दिलेल्या विकासकामांचा उल्लेखदेखील कार्यवृत्तामध्ये केला जात नाही.

मुख्याधिकारी यांनी सर्वसाधारण सभा तसेच विशेष सभा यामध्ये प्रशासकीय नियमांच्या अधीन न राहता विरोधी बाकांवरील सदस्यांच्या मागण्यांची कोणतीही दखल घेतली जात नाही. सर्वसाधारण सभेमध्ये विरोधी बाकांवरील सदस्यांनी सुचवलेल्या विकासकामांच्या संदर्भात सत्ताधारी पक्ष हे कायम निधीची कमतरता आहे, असे उत्तर देत आहेत. मात्र, सत्ताधारी पक्षाकडील सर्व विकासकामांची बहुमताच्या आधारे मंजुरी घेतली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update : १० जूनला भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेईल- पंतप्रधान नरेंद्र मोदी

World Athletics Relays : भारतीय महिला अन् पुरुष संघाची रिलेमध्ये दमदार कामगिरी, आता ऑलिम्पिक पदकासाठी पॅरिसमध्ये धावणार

Google Chrome Errors: गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा 'हे' बदल

Sharad Pawar: "मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी..."; शरद पवारांसाठी हेमंत ढोमेचं ट्वीट

California Bridge : कुठेच न पोहोचणारा 11 बिलियन डॉलरचा पूल! अमेरिकेतला ब्रिज झाला चेष्टेचा विषय

SCROLL FOR NEXT