satara narendra modi speech mp udayanraje bhosale lok sabha election Sakal
सातारा

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कऱ्हाड येथे घेण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महासंकल्प विजय सभेचे.पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच कऱ्हाडला येत असल्याने त्यांच्या दौऱ्याची प्रचंड उत्सुकता होती.

हेमंत पवार

कऱ्हाड : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आगमन होताच सुरु झालेला ‘मोदी...मोदी’चा अखंड नारा, सातारा, सांगली जिल्ह्यातुन सभेसाटी आलेले हजारो कार्यकर्ते, महिला, रखरखत्या उन्हातही मोदींचे भाषण एेकण्यासाठी सकाळपासुनच मोठ्या उत्साहाने जमलेले आबालवृध्द असे वातावरण आज सोमवारी कृषी विभागाच्या बीज गुणन केंद्रावरील मैदानाने अनुभवले.

निमित्त होतं खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कऱ्हाड येथे घेण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महासंकल्प विजय सभेचे.पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच कऱ्हाडला येत असल्याने त्यांच्या दौऱ्याची प्रचंड उत्सुकता होती.

सभेची वेळ दुपारी एकची असल्याने सकाळपासूनच सातारा व सांगली जिल्ह्यातील नागरिक, कार्यकर्ते, महिला सभास्थळी येत होते. सभा मंडपाकडे येण्यासाठी विविध मार्ग होते. त्यामुळे आपआपल्या भागातुन लोक त्या मार्गे सभामंडपात येत होते.

सभेसाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महायुतीतील विविध घटक पक्षांचे नेते, आजी-माजी आमदार, पालकमंत्री यांचे कार्यकर्ते शक्तिप्रदर्शन करत सभास्थळी येत होते. यावेळी कार्यकर्त्यांनी आपआपल्या पक्षासह उमेदवारांच्या चिन्हाचे स्कार्फ गळ्यात घातले होते.

काही महिलांही गळ्यात भगवा स्कार्फ व फेटा बांधुन सभास्थळी दाखल झाल्या होत्या. अब की बार ४०० पार, हमारा परिवार मोदी परिवार, असे फलक हातात घेऊन कार्यकर्ते सभा स्थळाकडे जात होते.

सभास्थळी आज सोमवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सभास्थळी आगमन झाले. यावेळी उपस्थित हजारो लोकांनी उभे राहून त्यांना त्यांना अभिवादन केले. यासह मोदी...मोदी नावाची जोरदार नारा देत परिसर दणाणून सोडला. मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय श्रीराम, भारत माता की जयच्या घोषणा देताच याला उपस्थितांनी प्रचंड प्रतिसाद दिला.

श्रीरामाची मुर्ती अनु पाच किल्यावरची मातीची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सभेच्या सुरुवातीला त्याचे स्वागत खासदार उदयनराजे भोसले, साताऱ्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई, आमदार शिंवेंद्रसिंहराजे भोसले, महेश शिंदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रेशखर बावनकुळे, अतुल भोसले यांच्या उपस्थितीत श्री रामाची चांदीची मुर्ती देवुन करण्यात आले. यावेळी अतुल भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, विक्रम पावसकर, एकनाथ बागडी आदींच्यावतीने पाच किल्यांवरील मातींचा कलश देवुन पंतप्रधान मोदी यांचे स्वागत यावेळीही टाळ्यांचा कडकडाट झाला.

सभेत रामदास आठवलेंनी भरला रंग

शशिकांत शिंदे निवडणुकीला उभे राहून फसले, कारण निवडून येणार आहेत उदयनराजे भोसले अशा चारोळीने सुरवात करुन केद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उपस्थितांनी सभेत रंग भरला. शिंदेची भानगड पाहून वाशीचे लोक हसले, आणि उदयनराजे लोकसभेत जाऊन बसले. साताऱ्यात झाले आहे उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंची एकी, त्यामुळे राष्ट्रवादी वाल्यांची फिरली आहेत डोकी अशा चोरोळ्यातुन मंत्री आठवले यांनी मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास सुरू आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान मजबूत करायचे आहे, देशाची लोकशाही बळकट करायची आहे. जगात देशाला प्रथम क्रमांकावर न्यायचे आहे. देशाला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी मोदींची विचारधारा घराघरात पोहोचवा. सबका साथ सबका विकास हीच आहे मोदींची विचारधारा. त्यांच्या विचाराला साथ म्हणजे उदयनराजेंना मत देणे असे आहे. त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election Results: पती-पत्नीचा दणदणीत विजय; पुण्यातल्या 'या' प्रभागाची राज्यात होती चर्चा

Kolhapur Election Party Wise Winners : कोल्हापूर महानगरपालिका पक्षनिहाय विजयी उमेदवार लिस्ट, जाणून घ्या पक्षीय बलाबल

Maharashtra Municipal Election 2026 Results Live : अमरावतीत अंतिम निकाल नाही; तरीही भाजप-राष्ट्रवादीच्या युतीची चर्चा; सहा वाजेपर्यंत कुणाच्या किती जागा?

MBMC Results: मीरा-भाईंदरमध्ये भाजप मोठ्या फरकाने सत्तेत येणार! इतर पक्षांना मोठा फटका; जाणून घ्या विजयी उमेदवारांची यादी

ना राधा पाटील ना दीपाली सय्यद; 'या' सदस्याला मिळालीत सगळ्यात जास्त मतं; पाहा 'बिग बॉस मराठी ६'चा व्होटिंग ट्रेंड

SCROLL FOR NEXT