सातारा

कोरोनाचा मृत्यूदर होणार कमी; सिव्हिलमध्ये होतेय ही उपाययोजना

प्रवीण जाधव

सातारा : कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर तातडीने योग्य उपचार होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा रुग्णालयात 15 बेडचा अद्ययावत अतिदक्षता विभाग उभारणीचे काम सुरू झाले आहे. पुढील आठवड्यामध्ये या वॉर्डची प्रत्यक्ष सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूदर कमी आणण्यासाठी मदत होणार आहे. 

जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. आजच रुग्णांच्या संख्येने दीड हजारांचा टप्पा ओलांडला आहे. रुग्णसंख्या वाढल्यामुळे साहजिकच गंभीर रुग्णांचे प्रमाणही वाढत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पूर्वीचे आजार असलेल्या वृद्धांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांना होणारा त्रास वाढतो आहे. त्यामुळे गंभीर परिस्थितीत असलेल्या रुग्णाला कृत्रिम श्‍वासोच्छवासाची आवश्‍यकता भासते. त्यामुळे त्या रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार करावे लागतात, तरच त्या रुग्णाचे प्राण वाचण्यास मदत होते. 

जिल्हा रुग्णालयाची सध्याची परिस्थिती पाहता आत्ताच्या अतिदक्षता विभागात केवळ सहा व्हेंटिलेटर्सच उपलब्ध आहेत. सुरवातीच्या टप्प्यामध्ये रुग्णसंख्या कमी असताना गंभीर रुग्णांची संख्याही कमी होती. त्यामुळे या अतिदक्षता विभागामध्ये उपचार होत होते. परंतु, रुग्णसंख्या वाढल्यामुळे सध्या उपलब्ध असलेले सर्वच सहा बेड व व्हेंटिलेटर्स केवळ कोरोनाच्या रुग्णांना लावावे लागतात. काही वेळा त्यापेक्षाही जादा रुग्ण गंभीर होण्याची परिस्थिती निर्माण होते. 


त्याचबरोबर जिल्हा रुग्णालयात केवळ कोरोनाचेच रुग्ण येतात, अशी परिस्थिती नाही. अन्य आजार व अपघातांतील गंभीर रुग्णही जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येतात. त्यातही हृदयविकाराचा झटका, मेंदूतील रक्तस्त्राव, सर्पदंश, विषारी औषध पिलेले, श्‍वसनाचे आजार यातील गंभीर रुग्णांना कृत्रिम श्‍वासोच्छवास व अतिदक्षता विभागातील उपचारांची गरज असते. परंतु, सध्याच्या परिस्थितीत या रुग्णांनाही व्हेंटिलेटर्स उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर्स आवश्‍यक असल्याबाबत "सकाळ'नेही वृत्त प्रसिद्ध केले होते. 

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना बाधितांचा मृत्यूदर कमी आणण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यास सुरवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांनी नुकतीच वैद्यकीय अधिकाऱ्यांची एक बैठकही आयोजित केली होती. त्यात समस्या जाणून घेऊन उपाययोजनाही सुचविल्या होत्या. त्याचबरोबर गंभीर रुग्णांना उपचारासाठी अतिदक्षता विभागाची गरज लक्षात घेऊन त्यांनी जिल्हा रुग्णालयात 15 बेडचा नवीन अतिदक्षता विभाग सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे.

नवीन अतिदक्षता विभागात सेंट्रल ऑक्‍सिजन सिस्टिमच्या पाइप बसविण्याचे काम सुरू आहे. तीन ते चार दिवसांमध्ये ते पूर्ण होईल. त्याचबरोबर बेड, व्हेंटिलेटर्स, मॉनिटर्स व इतर उपकरणांसाठीही निधी मंजूर करण्यात आला आहे. पुढील आठवड्यात या अतिदक्षता विभागाचे प्रत्यक्ष कामकाज सुरू होणार आहे. त्यामुळे कोरोनाचा मृत्यूदर रोखण्यास मदत होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT