सातारा

खळबळजनक : सातारा शहर पुन्हा कोरोना बाधीत; जिल्ह्यात पाच नवे कंटेनमेंट झोन

सकाळ वृत्तसेवा

सातारा : सातारा व जावळी तालुक्‍यातील नव्याने कोरोना बाधीत रुग्ण सापडल्यामुळे प्रांताधिकारी व इन्सीडंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी रविवारी रात्री सातारा शहर व तालुक्‍यात प्रत्येकी एक तर, जावळी तालुक्‍यात तीन कंटेनमेंट झोन (प्रतिबंधीत क्षेत्र) जाहिर केले आहेत. 

सातारा शहरातील गेंडामाळ, येथील एका रहिवासी एक कोरोना बाधीत आढळला होता. त्यामुळे गेंडामाळ परिसरातील संबंधीत रुग्णाचे घर केंद्रस्थानी मानून तो परिसर 
22 एप्रिलला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहिर करण्यात आला होता. दरम्यान या परिसरात सापडलेला रुग्ण बरा झाला आहे. त्यामुळे हा परिसर मुक्त करण्यात आला होता. दरम्यानच्या काळात सातारा शहरात कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळून आला नव्हता. मात्र, काल (रविवारी) समर्थ मंदीर परिसरातील बालाजी नगर अपार्टमेंटमध्ये एक कोरोना बाधीत रुग्ण आढळून आला. 

नवा रुग्ण सापडल्यामुळे हा परिसर प्रतिबंधीत करण्याबाबत सातारा तहसीलदार, मुख्याधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुल्ला यांच्याकडे विनंती केली होती. त्यानुसार त्यांनी आज समर्थ मंदीर परिसरात कंटेनमेंट झोन जाहिर केला. पुर्वेला श्री समर्थ ग्लास सेंटर ते बालाजीनगर अपार्टमेंट संरक्षक भिंत, पश्‍चिमेला बी विंग साळुंखे प्लॉट ते संतोष ट्रान्सपोर्ट, उत्तरेला संतोष ट्रान्सपोट ते श्री समर्थ ग्लास सेंटर, दक्षिणेला बालाजी नगर अपार्टमेंट संरक्षक भिंत ते बी विंग साळुंखे प्लॉट अशा या प्रतिबंधीत क्षेत्राच्या सिमा राहणार आहेत. 

शहराप्रमाणे सातारा तालुक्‍यातील कुसवडे येथे रुग्ण सापडल्यामुळे या गावातही कंटेनमेंट जाहिर करण्यात आला आहे. जावळी तालुक्‍यातही वहागाव, भणंग, काटवली व बलोशी या गावातही कोरोना बाधीत रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे तेथील तहसीलदार व आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानुसार मुल्ला यांनी या गावातही प्रतिबंधीत क्षेत्र जाहिर केली आहेत. त्यामुळे या परिसरातही निर्बंध आले आहेत. 

या परिसरच्या हद्दी सिल केल्या जाणार आहेत. तसेच तेथे अत्यावश्‍यक सेवेतील अधिकारी व कर्मचारी वगळता अन्य नागरिकांना प्रवेश करण्यास व बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. या ठिकाणी केवळ अत्यावश्‍यक सेवा घरपोच देण्याची व्यवस्था तयार करण्यात येणार आहे. तसेच या परिसरातील सर्व नागरिकांनी आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करावे असे आवाहन श्री. मुल्ला यांनी केले आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीने १५व्या मजल्यावरून मारली उडी, घटनास्थळी सापडली चिट्ठी

Shiv Sena Symbol Dispute : शिंदे गटाने ठाकरेंचे दावे खोडले मूळ पक्षाचा प्रतिनिधी गट ठरविण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार

UPI Transaction Charges : UPI वर ०.४ टक्के शुल्क; १० हजार, १ लाख, १० लाखांच्या व्यवहारावर किती रुपये? जाणून घ्या

Marathi News Live Updates : नागपुरात भरधाव कारचा भीषण अपघात, ७ जणांना उडवलं

Helicopter Crash : भीषण अपघात! हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये कोसळलं, ३ जणांचा जागीच मृत्यू, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT