सातारा

कोरोनाशी लढण्यासाठी जिल्हा रुग्णालयात नवीन शस्त्र; रुग्णांचे प्राण वाचविण्यात होणार मदत

प्रवीण जाधव

सातारा : कोरोना विरूद्धच्या लढ्यामध्ये जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना आता एक नवे शस्त्र मिळाले आहे. कोरोनाची चाचणी करू शकणाऱ्या या यंत्रामुळे कोरोना बाधीतांचा जिव वाचविण्यात मोठी मदत होणार आहे. 
 
जिल्ह्यामध्ये काही दिवसापूर्वी कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयाला कोरोनाची चाचणी करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्याचप्रमाणे जिल्हा रुग्णालयातही या तपासणीची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होते. त्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना आता पुण्याच्या प्रयोग शाळेवर अवलंबून
रहावे लागणार नाही. कोरोना आजाराची लक्षणे असलेल्या गंभीर रुग्णांच्या घशातील स्रावांच्या चाचण्यांसाठी जिल्हा रुग्णालयात ट्रूनॅट हे अद्ययावत मशीन बसविण्यात आले आहे. 

या मशीनद्वारे चाचण्या करण्यास भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद तसेच नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने मान्यता दिली आहे. नागपूर येथील एम्सच्या मायक्रोबायॉलॉजी विभागाच्या प्रा. डॉ. मीरा शर्मा यांनी जिल्हा रुग्णालयातील सुविधा, मशीन आणि या चाचण्यांसाठी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले प्रशिक्षण आदींचा आढावा आणि गुणवत्तेची तपासणी केली. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात ट्रूनॅट मशीनद्वारे कोरोनाच्या चाचण्या करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या मशीनमध्ये औषध प्रतिबंधक क्षयरोगाच्या चाचण्या करण्यात येतात. या मशीनद्वारे संशयित रुग्णांच्या घशातील स्रावांच्या आरडीआरपी व रिअल टाइम-पीसीआर या पद्धतीने चाचण्या करण्यात येतात. 

सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे त्यांच्या निकटवर्तीयांच्याही मोठ्याप्रमाणावर तपासण्या कराव्या लागत आहेत. त्यामुळे अहवाल येण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी जात आहे. तोपर्यंत रुग्णांवर वेगाने उपचार सुरू करता येत नाहीत. ही अडचण आता दूर होणार आहे. या मशीनद्वारे गंभीर रुग्णांच्या चाचण्या तातडीने करून त्यांचे अहवाल लवकर मिळवणे जिल्हा रुग्णालयातील यंत्रणांना शक्‍य होणार आहे. या मशीनद्वारे एका दिवसाला 35 ते 40 चाचण्या करता येणार आहे. त्यामुळे तिव्र लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर योग्य वेळेत उपचार सुरू करता येणार आहेत. त्यामुळे तातडीच्या चाचण्यांसाठी अन्य प्रयोगशाळांवरील जिल्हा रुग्णालयाचे अवलंबित्व कमी होणार आहे. 

हे यंत्र मिळवणे व सुरू करण्याची सर्व प्रक्रीया पार पाडण्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अविनाश पाटील यांचे मार्गदर्शन खाली जिल्हा क्षयरोग केंद्रातील डॉ. श्रीमती ए. व्ही. जाधव, कर्मचारी, नोडल ऑफिसर व
जिल्हा रुग्णालयातील डॉ. सारिका बडे व प्रयोगशाळा तंत्रज्ञांनी परिश्रम घेतले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणी नागरीक ढसाढसा रडले, तेहरानमध्ये लोटला जनसागर; भारतात काश्मीरमध्येही रस्त्यावर उतरले लोक

Horoscope 2026: मार्चमध्ये ‘या’ 3 राशींचा लागणार जॅकपॉट! पण काहींसाठी वाढणार अडचणी

Amravati Crime : माझी हो...अन्यथा जाळून मारेल! एकतर्फी प्रेमप्रकरणातून १० वीच्या विद्यार्थिनीला धमकी; परीक्षा केंद्रासमोरच राडा

Katol Explosion News : काटोलमध्ये बारूद कंपनीत मोठा स्फोट; १२ कामगारांचा मृत्यू, अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

Maharashtra Weather Update : मार्चमध्ये उष्णतेच्या लाटा; उन्हाचा चटका अधिक जाणवणार; यंदा उन्हाळ्यात कसं असेल तापमान?

SCROLL FOR NEXT