Satara Latest Marathi News 
सातारा

Don't Worry! कोयना धरणातून 1350 क्यूसेक पाण्याचा विसर्ग; आपत्कालीन 'विमोचक' दरवाजा साडेतीन फुटाने उचलला

विजय लाड

कोयनानगर (जि. सातारा) : सध्या राज्यात उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असून उन्हाचे चटके बसत आहेत. म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेसाठी वारणा धरणातून पाणी सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग उन्हाची तीव्रता वाढल्याने कमी पडत आहे. 

यातच कृष्णा नदीवरील बंधाऱ्यातील पाणी वापरामुळे साटपेवाडी, नागठाणे, डिग्रज, सांगली व म्हैसाळ या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यासाठी पुरेसा विसर्ग होत नसल्याने या योजनेसाठी कोयना धरणातून पाणी सोडण्यात यावे, ही मागणी सांगली पाटबंधारे विभागाने केली आहे. यामुळे दुष्काळी भागासाठी कोयना धरणाचा आपत्कालीन दरवाजा साडेतीन फुटावर उचलून त्यातून 1350 क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. कोयना धरणात सध्या ६१ टीएमसी एवढा मुबलक पाणीसाठा आहे.

कोयना धरणात मुबलक पाणीसाठा असून पश्चिमेकडील सिंचन प्रकल्पासाठी धरणाचा पायथा वीजगृहाचे दोन्ही युनिट चालूच आहेत. दोन्ही युनिटच्या माध्यमातून २,१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग चालूच आहे. टेंभू, ताकारी योजनेचे १९ पंप सुरु आहेत. त्यात म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी वारणा धरणातून पाणी सोडण्यात येत असले, तरी उन्हाची तीव्रता वाढल्याने हा विसर्ग कमी पडत आहे. 

उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता कोल्हापूर पध्दतीचे बंधारे व उपसा सिंचन योजनांचे आवर्तन सुरळीतपणे पार पाडण्याच्या दृष्टीने कृष्णा नदीमध्ये आवश्यक पाणी पातळी राखणे आवश्यक आहे. शनिवारी दुपारी ११.३० वाजता विमोचक हा आपत्कालीन दरवाजा साडेतीन फुटाने वर उचलून त्यातून नदीपात्रात १,३५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. धरणातून पूर्वेकडील सिंचन प्रकल्पासाठी आतापर्यंत २२.३६ टीएमसी, तर पश्चिमेकडील वीज प्रकल्पासाठी ४७.६७ टीएमसी पाणीसाठाचा वापर झाला आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT