Satara Latest Marathi News 
सातारा

साताऱ्यातील विकासकामांसाठी 17 कोटींचा निधी मंजूर; खासदार पाटलांच्या प्रयत्नाने अर्थसंकल्पात तरतूद

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून सातारा लोकसभा मतदारसंघातील विविध कामांसाठी 17 कोटी 28 लाखांच्या निधीची यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती खासदार श्रीनिवास पाटील यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली.
 
सातारा लोकसभा मतदारसंघातील विविध पुलांसह रस्त्यांच्या कामासाठी खासदार पाटील यांनी पाठपुरावा केला होता. तोही निधी मंजूर आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडे विशेष प्रयत्न केल्याने कामांना निधी मंजूर आहे. त्यात पाटण तालुक्‍यातील निसरे, मारुल, गुढे, काळगाव रस्त्यासह निसरे फाटा ते निसरे गाव व मारुल हवेली ते कोरिवळे रस्ता रुंदीकरण व सुधारण्यासाठी निधीसह गमेवाडी ते पाडळोशी रस्त्यासाठी तीन कोटी, गोटेवाडी ते येळगाव रस्ता सुधारण्यासाठी दोन कोटी 60 लाख. 

तसेच चव्हाणवाडी ते घराळवाडी रस्ता रुंदीकरणासाठी पाच कोटी 60 लाख, गलमेवाडी ते पाटण तालुका हद्दीपर्यंतच्या रस्त्यासाठी दीड कोटी, सुर्ली ते पाचुंद ते राज्य मार्ग व सुर्ली गावाजवळ लहान पुलाच्या बांधकामासाठी एक कोटी 18 लाख, मसूर रस्त्यावरील यशवंतनगर, नडशी ते कोपर्डे हवेलीपर्यंत लहान पुलाच्या बांधकामासाठी 80 लाख, खंडाळा तालुक्‍यातील धावडवाडी फाटा ते अहिरे रस्त्यासाठी एक कोटी 10 लाखांचा निधी मंजूर आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT