Satara Latest Marathi News 
सातारा

दिलासादायक! साताऱ्यात 212 गावांनी कोरोनाला वेशीबाहेरच रोखलं; पाटण तालुका आघाडीवर

उमेश बांबरे

सातारा : देशातील गावागावांत धुमाकूळ घालून संपूर्ण मानव जातीला कोरोनाने वेठीस धरले. मात्र, सातारा जिल्ह्यातील 212 गावांनी कोरोनाला वेशीबाहेरच रोखण्यात यश मिळविले आहे. गेल्या वर्षभरात या गावांतून एकही रुग्ण सापडलेला नाही. त्यामध्ये पाटण तालुक्‍यातील सर्वाधिक 66 गावे, तर त्यापाठोपाठ महाबळेश्‍वर तालुक्‍यातील 53 गावांचा समावेश आहे. 

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण मार्चमध्ये सापडला अन्‌ सातारकरांच्या काळजात धस्स झाले. त्यानंतर लॉकडाउन करण्यात आले. जिल्हा रुग्णालयात कोरोनासाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष स्थापन करून त्यामध्ये कोरोनाबाधितांवर उपचार करण्यास सुरवात झाली. त्यानंतर आजपर्यंत म्हणजे एक वर्ष साताऱ्यातील जनता कोरोनाशी मुकाबला करत आहे. या कालावधीत आजअखेर तब्बल 1,864 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर 59 हजार 913 नागरिक कोरोनाबाधित झाले आहेत. त्यापैकी 56 हजार 79 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. 

विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या मुख्याध्यापकाविरोधात शिवसेना आक्रमक; महाबळेश्‍वरात मोर्चा

कोरोनाचा प्रसार गावागावांत होऊ शकतो, हे ओळखून गावातही कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यात आली. महामार्गाच्या बाजूच्या गावांनी तर गावात येणारा रस्ताच बंद केला. गावात अनोळखी माणूस आला तरी त्यांची चौकशी करून त्याला कोरोनाची कोणतीही लक्षणे आहेत का, याची तपासणी केली जात होती. काही ठिकाणी परदेशातून आलेल्या तर काही ठिकाणी देशातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या नागरिकांमुळे कोरोनाचा संसर्ग झाला. त्यामुळे तब्बल दीड हजारावर गावांत कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे उपचारासाठी रुग्णालये कमी पडू लागली. त्यामुळे शासनाने जम्बो कोविड हॉस्पिटल सुरू केले. त्यामध्ये सुमारे चारशे रुग्णांची उपचाराची सोय झाली. पण, सुरवातीला कऱ्हाड तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. 

पण, जिल्ह्यातील अशी 212 गावे आहेत, ज्यांनी कोरोना विषाणूला आपल्या गावच्या वेशीबाहेरच रोखले आहे. या गावांतील ग्रामस्थांनी कोरोनासंबंधित सर्व उपाययोजना करून गावात कोरोनाचा रुग्णच येऊ दिला नाही. त्यामध्ये पाटण तालुक्‍यातील सर्वाधिक 66 गावांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ महाबळेश्‍वर तालुक्‍यातील 53, सातारा तालुका- 31, कऱ्हाड तालुका- 22 गावांचा समावेश आहे. या 212 गावांचा आदर्श घेऊन इतर गावांनीही आता यापुढे कोरोना आपल्या गावात पुन्हा प्रवेश करणार नाही, याची खबरदारी घेणे गरजेचे आहे, तरच आपण संपूर्ण जिल्हा कोरोनामुक्त करणे शक्‍य आहे. 

कोरोनामुक्त गावांची तालुकानिहाय संख्या 
महाबळेश्‍वर- 53, जावळी- 24, पाटण- 66, फलटण- 3, खंडाळा- 2, माण- 2, वाई- 3, खटाव- 1, सातारा- 31, कोरेगाव- 5, कऱ्हाड 22. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chamoli Tunnel Collapse: अचानक स्फोटाचा आवाज, काही क्षणांत टनल बनली ‘मृत्यूचा सापळा’; 7 जणांचा मृत्यू, वाचलेल्यांनी सांगितला थरार

MD Smuggling: एमडी तस्करीसाठी दुबईतून फंडिंग; जरीपटका येथील मुख्य आरोपीविरोधात ‘लुक आऊट’ नोटीस

Maharashtra River Linking: मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा! महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्प; याच वर्षी काम सुरू होणार

Marathi News Live Updates : वीर धरणातून 5,737 क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीपात्रात सुरू

Kolhapur Baby Death : दूध पाजताना काळजी घ्या! अवघ्या 31 दिवसांच्या बाळाचा ठसका लागून दुर्दैवी अंत; कोल्हापुरातील काळीज पिळवटून टाकणारी घटना

SCROLL FOR NEXT