सातारा

शिवछत्रपती पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी अडीच कोटींचा निधी; उदयनराजेंच्या मागणीची पालकमंत्र्यांकडून दखल

गिरीश चव्हाण

सातारा : साताऱ्यातील पोवई नाक्‍यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे सुशोभीकरण आणि इतर ऐतिहासिक वास्तूंच्या सुशोभीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीतून अडीच कोटींचा निधी देण्याच्या सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना दिल्या आहेत. याबाबतची मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी पालकमंत्र्यांकडे केली होती. 

साताऱ्यात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. त्यातील काही वास्तू ओघात नामशेष झाल्या आहेत. उर्वरित वास्तुंचे जतन करण्यासाठी उदयनराजे आग्रही आहेत. पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसराच्या सुशोभीकरण काम, निधीबाबत नुकतीच जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेतली. त्यापूर्वी त्यांनी मंत्री पाटील यांच्याकडे ऐतिहासिक वास्तुंच्या देखभालीसाठी "नियोजन'मधून निधीची मागणी केली होती. त्यानुसार छत्रपतींच्या पुतळा परिसराच्या सुशोभीकरणासाठी दुसऱ्या टप्यातील अडीच कोटींचा निधी तात्काळ देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. तसेच महाराणी ताराराणी समाधी स्मारक, ऐतिहासिक वास्तू सुशोभीकरणासाठी "जिल्हा नियोजन'मधून निधी देण्याचे ठोस आश्‍वासन दिल्याची माहिती उदयनराजेंच्या कार्यालयाकडून देण्यात आली. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT