सातारा

सातारा नियोजन समितीला शंभर टक्के निधी; कोरोनात थांबविलेली कामे लागणार मार्गी

गिरीश चव्हाण

सातारा : नियोजन समितीला जिल्हा वार्षिक योजनेतील 100 टक्के म्हणजेच 325 कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे या वर्षातील कोरोनामुळे थांबविलेली विकासकामे आता मार्गी लागणार आहेत. त्यासाठी विविध विभागांकडून कामांची प्रशासकीय मान्यता घेण्यासह टेंडर प्रक्रियेची कामे सुरू होणार आहेत. दरम्यान, सध्या उपलब्ध निधीतून 16 टक्के म्हणजेच 54 कोटी रुपये कोविड उपाययोजनांवर खर्च केला जाणार आहे. 

कोरोनाच्या महामारीमुळे शासनाने सर्व विकासकामांना स्थगिती देऊन सर्व निधी कोविडसाठी वळविला होता. त्यामुळे जिल्ह्याला केवळ 33 टक्केच निधी उपलब्ध झाला होता. या निधीतूनही कोरोनासाठी उपाययोजना करायच्या होत्या. त्यामुळे केवळ जुन्या व अपूर्ण कामांनाच निधी दिला जात होता. त्यामुळे जिल्ह्यातील विकासकामे ठप्प झाली होती. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे शासनाच्या तिजोरीत पुन्हा पैशाचा ओघ सुरू झाला. त्यामुळे शासनाने सर्व जिल्ह्यांना नियोजन समितीच्या जिल्हा वार्षिक योजनेसाठी संपूर्ण निधी उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला. पण, ज्यांनी आयपीएएस प्रणालीचा वापर केलेला नाही, अशा 16 जिल्ह्यांना 75 टक्केच निधी उपलब्ध केला आहे.

उसाला एफआरपी एवढा पहिला हप्ता द्या; साताऱ्यातील जनप्रबोधन यात्रेत शेतकरी संघटनेची मागणी
 
शंभर टक्के निधी उपलब्ध होण्यामध्ये सातारा जिल्ह्याचा समावेश आहे. जिल्ह्याला 325 कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे. यातून 16 टक्‍के म्हणजे 54 कोटी रुपये कोविडसाठी खर्च केले जाणार आहेत. आता 100 टक्के जिल्हा वार्षिक योजनेला निधी मिळाल्याने सर्व शासकीय विभागांकडील प्रलंबित विकासकामांना निधी उपलब्ध होणार आहे. आता विविध विभागांकडील कामांना प्रशासकीय मान्यता देणे, टेंडर प्रकिया राबविणे, तसेच जुन्या मंजूर कामांची टेंडर प्रक्रिया ही कामे गती घेणार आहेत.
 
संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT