सातारा

कऱ्हाड-चिपळूण मार्गावर दुचाकीस्वाराचा खड्ड्यांमुळे अपघाती मृत्यू; संतप्त प्रवाशांचा रास्ता रोको

विजय लाड

कोयनानगर (जि. सातारा) : कऱ्हाड-चिपळूण मार्गावरील राममळा येथे खड्डा चुकवताना कोयना जलविद्युत प्रकल्पातील राहूल काटवटे (वय 40) यांच्या दुचाकीचा अपघात होऊन ते जागीच ठार झाले. अपघातास बांधकाम विभागाचा हलगर्जीपणा जबाबदार असून, त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करा, तरच मृतदेह ताब्यात घेण्याचा पवित्रा संतप्त प्रवासी व नातेवाइकांनी घेतला. त्यानंतर कऱ्हाड-चिपळूण राज्यमार्ग रोखून सुमारे एक तास "रास्ता रोको' करण्यात आला. 

कोयना जलविद्युत प्रकल्पात पोफळी (ता. चिपळूण) येथील कर्मचारी राहूल काटवटे गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास काम संपल्यानंतर कऱ्हाडकडे निघाले होते. कऱ्हाड-चिपळूण राज्य मार्गावर खड्ड्यांची संख्या वाढली आहे. श्री. काटवटे राममळा येथे आल्यानंतर रस्त्यातील खड्डा चुकवत असताना त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. अपघातात श्री. काटवटे यांना गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

अपघाताची बातमी समजल्यानंतर संतप्त झालेल्या प्रवासी वर्गाबरोबर मृत काटवटे यांचे नातेवाइकांनी कोयनानगर येथील सामाजिक कार्यकर्ते संपत जाधव, वीज कर्मचारी यांनी बांधकाम विभागावर गुन्हे नोंद करण्याची मागणी केली. त्यानंतरच मृतदेह ताब्यात घेतो, अशी मागणी केली. त्यांनी राममळा अपघाताच्या घटनेच्या ठिकाणीच रास्ता रोको करण्यास सुरवात केली. दरम्यान, अपघाताची नोंद कोयना पोलिसात करण्यात आली. एक तासाच्या रास्ता रोकोनंतर पोलिसांनी याप्रश्नी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यासमवेत बैठक घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला असल्याची माहिती कोयनानगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत माळी यांनी दिली. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: भारताची 'सुवर्ण' सुरूवात! सुरूची सिंग, कमलजीत 'Gen Z' चा आशियाई विक्रमासह गोल्डन निशाणा

तो अनप्रोफेशनल, खोटारडा... दिग्दर्शकाच्या आरोपावर बोलला ओंकार भोजने, म्हणतो- मी याचं उत्तर नक्की देईन

Beed False Cases Claim : बीडमध्ये सर्वाधिक खोटे गुन्हे दाखल होतात अपर अधीक्षकांचा खळबळजनक दावा; पोलिस दलाला घरचा आहेर

Maharashtra Ganesh Visarjan Live: कसबा गणपतीच्या मिरवणुकीला उत्साहात सुरुवात, बाप्पाचे देखणे रूप पाहण्यासाठी आणि निरोप देण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी

OBC क्रिमी लेयरवरील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सरकारचा नकार, दोन वर्षांचा का मागितला वेळ?

SCROLL FOR NEXT