Satara Latest Marathi News 
सातारा

'फलटण कृषी उत्पन्न'चा कारभार राज्यातील बाजार समित्यांसाठी मार्गदर्शक ठरेल : सभापती रामराजे

किरण बोळे

फलटण शहर (जि. सातारा) : रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांनी शेतकरी हितासाठी विविध उपक्रम व योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. त्यामुळे फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार राज्यातील अन्य बाजार समित्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांनी व्यक्त केला. 

या समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन पार पडली. या वेळी मार्गदर्शन करताना रामराजे बोलत होते. या प्रसंगी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर, समितीचे अध्यक्ष रघुनाथराजे, श्रीराम कारखान्याचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब शेंडे, प्रा. भीमदेव बुरुंगले, संतोष खटके, उपसभापती भगवानराव होळकर, संचालक मोहनराव निंबाळकर, प्रकाश भोंगळे, शिवाजीराव लंगुटे, राजुरीचे सरपंच सचिन पवार आदींसह सभासद शेतकरी ऑनलाइन उपस्थित होते. 

रघुनाथराजेंनी कल्पकतेने बाजार समितीच्या माध्यमातून पेट्रोल पंप, पशुवैद्यकीय दवाखाना, कार्डियाक ऍम्ब्युलन्स, अन्नदाता सन्मान योजना, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन केंद्र आदी विविध सोयी व सुविधा उपलब्ध करून दिल्या, असेही रामराजेंनी नमूद केले. रघुनाथराजे यांनी प्रास्ताविकात गेल्या वर्षभरात बाजार समितीने राबविलेल्या विविध उपक्रमांचा व कामकाजाचा आढावा सादर केला. बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांनी विषयांचे वाचन केले. या वेळी सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. विनायक पाटील यांनी आभार मानले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT