सातारा

प्राज्ञपाठशाळा मंडळाच्या अध्यक्षपदी सरोजा भाटे; उपाध्यक्षपदी चपळगावकरांची नियुक्ती

भद्रेश भाटे

वाई (जि. सातारा) : येथील प्राज्ञपाठशाळा मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. सरोजा भाटे, तर उपाध्यक्षपदी न्या. नरेंद्र चपळगावकर यांची एकमताने निवड झाली. मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष व संस्थेचे विश्वस्त डॉ. शरद अभ्यंकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. 

या सभेत 2020-2025 या कालावधीसाठी संस्थेचे पदाधिकारी व संचालक मंडळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्ष म्हणून डॉ. सरोजा भाटे, उपाध्यक्षपदी न्या. नरेंद्र चपळगावकर, सचिवपदी अनिल जोशी व सहसचिवपदी भालचंद्र मोने यांची एकमताने निवड करण्यात आली. नवीन संचालक मंडळामध्ये डॉ. शंतनू अभ्यंकर, विवेक सावंत, डॉ. भाग्यलता पाटसकर, मोहन काकडे, डॉ. राजेंद्र प्रभुणे, भालचंद्र मोने, मदन प्रतापराव भोसले, डॉ. अनिमिष चव्हाण, नंदकुमार बागवडे या सर्वांची निवड करण्यात आली. स्वीकृत सदस्य म्हणून वासुदेव लक्ष्मणशास्त्री जोशी, मदनकुमार साळवेकर व शिवाजी राऊत यांची निवड करण्यात आलेली आहे. डॉ. अभ्यंकर हे वयोमानाप्रमाणे संस्थेतून निवृत्त झाले असून या वेळी त्यांचा मदन भोसले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. 

संस्थेतर्फे प्रकाशित होणाऱ्या "नवभारत' या मासिकासाठी नवीन संपादक मंडळाची स्थापना करण्यात आली असून, प्रमुख संपादक म्हणून डॉ. राजा दीक्षित, कार्यकारी संपादक अनिल जोशी व नवीन संपादक मंडळामध्ये अशोक कृष्णाजी जोशी, किशोर बेडकिहाळ, डॉ. शंतनू अभ्यंकर व डॉ. राजेंद्र प्रभुणे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. संस्थेचा "धर्मकोश' हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सध्या गतीने सुरू असून, तेथे काम करणाऱ्या तज्ज्ञ व्यक्तींना अनेक दानशूर संस्थांनी अर्थसाह्य केल्याची माहिती अनिल जोशी यांनी दिली. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Income Tax: नवीन कर प्रणालीचे 5 मोठे फायदे! कमी कर भरायचा असेल तर एकदा नक्की वाचा

रामनवमीची मिरवणूक अन् खुनशी राग! पुण्यात भरदिवसा तरुणाला संपवण्याचा प्रयत्न; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ समोर

Madhuri Dixit Viral: काशीत माधुरीचा ‘शिव तांडव’ व्हायरल; पतीसोबत गंगेत क्रूझ सवारी आणि बाबा विश्वनाथचे घेतले दर्शन

PSL Controversy: PSLमध्ये मोठा ड्रामा! फखर जमानकडून 'बॉल टॅम्परिंग'? पीसीबीने हायलाईट्समधून पुरावेच हटवले

गायत्रीच्या केळवणाची बातचं न्यारी! फिश फ्राय, मोदक, पुरणपोळी आणि बरंच काही, Video शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT