Satara Latest Marathi News 
सातारा

जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने विकासकामाला गती; अपशिंगे-देशमुखनगरला अडीच कोटींचा निधी

साहेबराव होळ

गोडोली (जि. सातारा) : सातारा तालुक्‍यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यात बोरगावहून अपशिंगेमार्गे (मिलीट्री) देशमुखनगरला जाणारा आठ किलोमीटर लांबीचा रस्ता पूर्णतः उखडला होता. साइडपट्ट्या खचलेल्या होत्या. रस्त्याच्या दुतर्फा असलेले नाले मुजलेले होते. वाहनचालकांना वाहन चालवताना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत. रखडलेल्या कामाला अनेकांनी विनाकारण खो घातला होता. लोकांची गरज लक्षात घेऊन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मध्यस्थी करून अडीच कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याला हिरवा कंदील दाखवला व कामाला सुरुवात झाली. 

याबाबत आंबेवाडीचे बाळासाहेब शितोळे व अपशिंगे येथील सुभाष निकम यांनी सांगितले की, आठ किलोमीटर लांबीच्या रस्त्याला बांधकाम विभागाकडून अडीच कोटी मंजूर झाले होते. मात्र, काही शेतकरी व काही संघटनांनी रस्त्याच्या कामाला खो घातला होता. त्यासाठी अजित पवार, मनोज घोरपडे व जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी संबंधितांना रस्त्याच्या कामातून सर्वांची सोय होणार आहे. या रस्त्यामुळे कोणीही बाधित होत नाही. शिवाय मंजूर झालेला निधी वेळेत खर्च झाला नाही तर निधी परत जाऊ शकतो, ही बाब सर्वांच्या लक्षात आणून दिल्यामुळे अखेर यांत्रिक पद्धतीने ठेकेदाराने रस्त्याचे काम युध्दपातळीवर सुरू केले आहे. 

आठ किलोमीटर लांब, साडेचार मीटर रुंद काही ठिकाणी 3.75 मीटर रुंद, अडीच कोटी रुपये खर्चाचे अंदाजपत्रक असलेला रस्ता साइडपट्ट्या भरणे, खडीकरण व डांबरीकरण येत्या काही महिन्यांमध्ये पूर्ण केले जाईल. कामाचा दर्जा चांगला राहणार आहे. या रस्त्यामुळे अपशिंगे (मिलीट्री), आंबेवाडी, खोजेवाडी, देशमुखनगर या गावांची सोय होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी काम मार्गी लावल्याने ग्रामस्थांच्या वतीने नुकताच बुके देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

दारुबंदीसाठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीने शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : पुण्यात रिमझिम पावसानेच झाड कोसळलं

SCROLL FOR NEXT