Satara Latest Marathi News Satara News
Satara Latest Marathi News Satara News 
सातारा

कऱ्हाडात वाळूसाठी शासकीय पातळीवर हालचाली; उपशासाठी सहा गावांचा नकार

हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : तालुक्‍यातून वाळू उपशासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याअंतर्गत तालुक्‍यातील 12 गावांत वाळू उपशासाठी प्रशासनाने कौल घेतला. त्यातील सहा गावांतील ग्रामसभांनी उपशासाठीचे ठराव नाकारले, तर एक प्रस्ताव तालुकास्तरीय तांत्रिक उपसमितीने अयोग्य ठरवला आहे. त्यामुळे उर्वरित सहा गावांमध्ये वाळू उपशासाठी लिलाव केले जाणार आहेत. 

तालुक्‍यातील कृष्णा नदीतून मोठ्या प्रमाणात वाळूउपसा केला जातो. त्यातून शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र, गेल्या चार वर्षांत वाळूचे लिलावच झालेले नाहीत. त्यामुळे वाळूचे दर सोन्याच्याबरोबरीने गेले आहेत. सातारा जिल्ह्यात वाळूउपसा करण्यात न आल्याने शेजारील जिल्ह्यातून वाळू आणावी लागत आहे. त्यामुळे चोरट्या वाळू उपशाला व वाहतुकीला मोठा जोर आला, ते महसूल प्रशासनाने केलेल्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. तालुक्‍यात यंदा 12 ठिकाणचे वाळूचे लिलाव काढण्यात आले. 

त्यात ओंड, वाठार (दोन), काले, मसूर, खालकरवाडी (दोन), येणके, वाठार, तांबवे, येरवळे दोन आणि उंडाळे या गावांतील नदीपात्रांचा समावेश आहे. त्यामध्ये ओंड, वाठार (एक योग्य), काले, मसूर, खालकरवाडी (दोन) येथील ग्रामसभांनी वाळू उपशास संमती दिली, तर तालुकास्तरीय तांत्रिक उपसमितीने वाठार येथील एक ठिकाण अयोग्य ठरवले आहे. त्याचबरोबर येणके येथील तांत्रिक समितीने प्रस्तावास मान्यता दिली असली तरी येणके येथील ग्रामसभेने संमती दिलेली नाही. त्याचबरोबर तांबवे व उंडाळेसह येरवळेतील दोन प्रस्तावास ग्रामसभेने मान्यता दिलेली नाही. त्यामुळे सहा ठिकाणचा प्रस्ताव नाकारण्यात आला आहे. त्यामुळे उर्वरित सहा ठिकणांवरील वाळू उपशासाठी लिलाव केले जाणार आहेत. 

सरपंचांवर जबाबदारी 

ज्या गावांनी ग्रासभेव्दारे गावाजवळून वाहणाऱ्या नदीपात्रातून वाळू उपशास परवानगी दिलेली नाही, त्या गावांतून चोरट्या पध्दतीने अवैधरित्या वाळूउपसा आणि वाहतूक होणार नाही, याची जबाबदारी संबंधित गावांतील सरपंच, प्रशासक आणि ग्रामपंचायतींवर निश्‍चित करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे तेथील उपशास संबंधित जबाबदार राहणार आहेत. 

कृष्णा नदीचा एकही प्रस्ताव नाही 

तालुक्‍यातील कृष्णा नदीची वाळू ही पश्‍चिम महाराष्ट्रासह कोकण, मुंबईतही प्रसिध्द आहे. लिलावासाठी पहिल्यांदा कृष्णा नदीतील वाळूला पसंती दिली जाते. यंदा मात्र कृष्णा नदीऐवजी दक्षिण मांड, उत्तर मांड व मसूर येथील ओढ्यातून वाळू उपशासाठी लिलाव करण्याची परवानगी मागण्यात आली होती. त्यामुळे यावेळी कृष्णा नदीतून वाळू उपशासाठी एकही प्रस्ताव नाही.  

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT