सातारा

वारुगड, बोथे, कळसकरवाडी परिसरात सापांचा वावर; श्रीपालवणात सर्पमित्राकडून जनजागृती

रूपेश कदम

दहिवडी (जि. सातारा) : मागील आठवड्यात खांडेवाडी (वारुगड) येथील सुलाबाई कदम व टाकेवाडीतील सोमनाथ शिंदे यांचा सर्पदंश होऊन दुर्दैवी मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर श्रीपालवणमध्ये सापांविषयी जनजागृती करण्यात आली. 

भरारी फाउंडेशन मलवडी, भैरवनाथ तरुण मंडळ श्रीपालवण यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मागील काही वर्षांत या परिसरातील श्रीपालवणच्या रंजना शिंदे व शंकर कदम, गाडेवाडीच्या दादासो घाडगे व स्वाती पवार, तर कळसकरवाडीच्या दीपाली जाधव, सीताबाई पवार व सिंधू काळे यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे, तर अनेक जण नशीब बलवत्तर म्हणून सर्पदंश होऊनही उपचार मिळाल्याने वाचले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना साप व त्यासंबंधित माहिती मिळावी म्हणून हा कार्यक्रम घेण्यात आला. 

मलवडीतील सर्पमित्र जितेंद्र जगदाळे यांनी मार्गदर्शन केले. भरारी फाउंडेशनचे सचिव रूपेश कदम यांनी साप चावल्यास कोणतेही गावठी उपचार न करता मलवडीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णाला न्यावे, असे आवाहन केले. श्रीपालवण, वारुगड, बोथे, कळसकरवाडी, गाडेवाडी, शिंदी खुर्द या परिसरात घोणस व नाग या विषारी सापांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. त्यामुळे श्रीपालवण येथे सर्पदंशावरील लस उपलब्ध व्हावी. जेणेकरून विषारी सर्पांच्या दंशामुळे ग्रामस्थांचे बळी जाणार नाहीत, अशी मागणी श्रीपालवणचे उपसरपंच तुषार कदम यांनी केली. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhandardara Accident: भंडारदरा पर्यटनाला गालबोट! मद्यपींची हुल्लडबाजी, भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

Buldhana Farmer Loan Waiver: बुलडाण्यात १.१६ लाख पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, ६७ हजार ई केवायसी प्रलंबित

Latest Marathi News Live Update : प्रशांत किशोर, नीरज सिन्हा की रेखा गुप्ता...; बांकीपूरमध्ये मतमोजणीची पहिली फेरी पूर्ण

'मी त्याच्या प्रायव्हेट पार्टवर जोरात मारलं' सावळ्याची जणू सावली फेम प्राप्तीने छेड काढणाऱ्याला शिकवली अद्दल, म्हणाली...

PM Narendra Modi: युवकांनी व्यसनांपासून दूर राहावे; पंतप्रधान मोदींचे मोठे आवाहन, राष्ट्रीय अभियानाची सुरुवात

SCROLL FOR NEXT