Satara Latest Marathi News 
सातारा

वीज कनेक्‍शन तोडल्यास बळीराजा स्टाईल आंदोलन; पंजाबराव पाटलांचा 'महावितरण'ला इशारा

हेमंत पवार

उंडाळे (जि. सातारा) : शेतकऱ्यांची शेतीपंप व घरगुती वीजबिल माफ करावे. शेतकऱ्यांची वीज कनेक्‍शन तोडू नये. कोणी कर्मचारी कनेक्‍शन तोडण्यासाठी पोलवर चढल्यास त्याला बळीराजा शेतकरी संघटना अडवणार, असा इशारा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी आज महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला.
 
महवितरणाच्या उंडाळेतील कार्यालयावर शेतकऱ्यांनी वीजबिल माफी द्यावी, कनेक्‍शन तोडू नये, यासाठी आंदोलन केले. पंजाबराव पाटील, धनाजीराव पाटील, उदय पाटील, श्रीकांत पाटील, मिलिंद पाटील, विकास शेवाळे, प्रमोद पाटील, अजित पाटील, अशोक पाटील, सुधीर पाटील, धनाजी कदम, धनाजी देशमुख यासह शेतकऱ्यांनी मागण्यांचे निवेदन अधिकाऱ्यांना दिले. निवेदनात तीन वर्षांत अतिवृष्टीमुळे व एक वर्षभर कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाला आहे. 

शेतकऱ्याला शेतीसाठी सरकारकडून आर्थिक मदतीची गरज असताना सरकार आपण वीजबिलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहात. शेतकऱ्यांनी घरगुती व शेती वीजबिले न भरल्याने वीज कनेक्‍शन तोडण्याचे काम सुरू केले आहे. ते पूर्णतः थांबून संपूर्ण वीजबिल माफ करण्यात यावे, शेतीपंपाचे वीजबिले रीडिंगप्रमाणे देण्यात यावीत, येळगाव शेती फिडर हा एमईआरसी फिडर जाहीर केला आहे तो पूर्वीप्रमाणे करावा, अन्यथा बळीराजा शेतकरी संघटना आपल्या स्टाईलने महावितरणला धडा शिकवेल व तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा दिला आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT