Satara Latest Marathi News 
सातारा

ऐतिहासिक स्थळांना भेट देताना प्लॅस्टिकचा वापर टाळा'; वन विभागाचे पर्यटकांना आवाहन

सूर्यकांत पवार

कास (जि. सातारा) : पर्यटकांनी ऐतिहासिक स्थळांना भेट देताना किंवा पर्यटन करताना प्लॅस्टिकचा वापर करू नये. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प लवकर प्लॅस्टिकमुक्त करावयाचा आहे. त्यासाठी पर्यटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन बामणोली वन्यजीव विभागाचे वनक्षेत्रपाल बाळकृष्ण हसबनीस यांनी केले. 

वासोटा, कोयना अभयारण्य आणि बामणोली परिसरात पर्यटकांनी पर्यटन करताना घ्यावयाच्या काळजीसंदर्भात ते बोलत होते. श्री. हसबनीस म्हणाले, "पर्यटनाला येताना सोबत प्लॅस्टिकमध्ये असणारे पदार्थ किंवा प्लॅस्टिक वस्तू सोबत परत घेऊन जाव्यात. त्यातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्प प्लॅस्टिकमुक्त होईल. प्लॅस्टिकमुळे जैवविविधता धोक्‍यात येते, प्लॅस्टिकमुळे अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे पर्यटकांनी पर्यटनाला जाताना किंवा ऐतिहासिक स्थळांना भेट देताना शक्‍यतो प्लॅस्टिकचा वापर टाळावा. 

काही अपरिहार्य कारणांमुळे प्लॅस्टिकचा वापर झाला तरी ते प्लॅस्टिक आपापल्या जबाबदारीवर त्याचे विघटन होईल, अशा पद्धतीने त्याचा वापर करावा.'' वासोटा आणि परिसर जैवविविधतेने आणि निसर्ग संपत्तीने हा परिसर बहरलेला आहे. त्याचे जतन करणे आणि त्याची वाढ करणे, ही सर्वांची जबाबदारी आहे. या सगळ्याचे भान ठेऊन प्लॅस्टिकचा वापर टाळावा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी बामणोली परिक्षेत्रातील वनपाल, वनरक्षक, वनमजुरांसह कर्मचारी उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT