Satara Latest Marathi News Satara Crime News 
सातारा

पोलिस ठाण्याच्या टॉवरवर चढून युवकाचे शोले स्टाइल आंदोलन; न्याय मिळत नसल्याने संताप

आयाज मुल्ला

वडूज (जि. सातारा) : शेती पिकाच्या चोरीबाबत पोलिसांकडून न्याय मिळत नसल्याबाबत भुरकवडी (ता. खटाव) येथील एका युवकाने चक्क पोलिस ठाण्याच्या वायरलेस टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. घटनास्थळी अतिरिक्त पोलिस अधीक्षकांनी समक्ष भेट दिल्यानंतर युवक टॉवरवरून खाली उतरला. काल रात्री साडेआठ ते पावणेबारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. सागरेश्वर हणमंत बनसोडे (रा. भुरकवडी) असे या युवकाचे नाव आहे. 

याबाबत हणमंत आनंदा बनसोडे यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीतील माहितीनुसार, भुरकवडी येथील बनसोडे यांच्या शेतजमिनीतून काही लोक शेती पिके चोरून नेत आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार बनसोडे हे शेत जमिनीची वहिवाट करीत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी काही लोकांनी शेत जमिनीतील पिके चोरून नेली. याबाबत न्याय मागण्यासाठी हणमंत बनसोडे व सागरेश्वर बनसोडे हे काल येथील पोलिस ठाण्यात आले होते. त्या वेळी पोलिसांशी चर्चा केल्यानंतर आपणास न्याय मिळत नसल्याची त्यांची भावना झाल्याने सागरेश्वर बनसोडे याने लगतच असणाऱ्या वायरलेस टॉवरवर चढून आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्या वेळी ठाण्यातील काही पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी विनवण्या करूनही बनसोडे याने माझी तक्रार दाखल करून घ्यावी या मागणीवर ठाम राहात खाली उतरण्यास नकार दिला. याठिकाणी जिल्हा पोलिस अधीक्षकांना बोलावून घ्यावे, अशी मागणी केली. 

घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक नीलेश देशमुख, प्रभारी नायब तहसीलदार प्रताप राऊत, सहायक पोलिस निरीक्षक मालोजीराव देशमुख आदी तळ ठोकून होते. त्यानंतर रात्री उशिरा अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संबंधिताचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्यास संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला असून, काही संशयितांना ताब्यात घेतल्याचे सांगितल्यानंतर तो टॉवरवरून खाली उतरला. सुमारे तीन तास हा थरार सुरू होता. घटनेचे गांभीर्य ओळखून त्याठिकाणी अग्निशामक दलाचे एक वाहन, रुग्णवाहिका तैनात करण्यात आली होती, तसेच अनुचित प्रकार घडू नये, म्हणून टॉवरच्या खाली गाद्या अंथरण्यात आल्या होत्या. रात्री अचानक झालेल्या या प्रकारामुळे घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. दरम्यान, पोलिस कर्मचारी दऱ्याबा नरळे यांनी सागरेश्वर बनसोडे याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा पोलिस ठाण्यात दाखल केला आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT