Satara Latest Marathi News, Satara News
Satara Latest Marathi News, Satara News 
सातारा

'कोणत्याही आपत्तीवर मात करण्यासाठी समाजाने एकत्र येणे गरजेचे'

प्रशांत घाडगे

सातारा : सामाजिक बांधिलकी जोपासत जास्तीत-जास्त रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्याअंतर्गत जिल्हा परिषदेने देखील पुढाकार घेत यशवंतराव चव्हाण सभागृहात नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. 

या प्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, समाजकल्याण सभापती कल्पना खाडे, महिला व बालकल्याण सभापती सोनाली पोळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय धोत्रे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते. या शिबिरात गौडा यांनी रक्तदान करून शिबिराचे उद्‌घाटन केले.

रक्तदानामुळे जीवनदान मिळते. कोणत्याही आपत्तीवर मात करण्यासाठी समाजाने एकत्र येणे गरजेचे असून, रक्तदान हा त्यासाठीचा उत्कृष्ट मार्ग असल्याचे उदय कबुले यांनी सांगितले. रक्तदान शिबिर दोन दिवस चालणार असून, पहिल्या दिवशी 43 अधिकारी-कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेने सर्व पातळ्यांवर खबरदारीचे उपाय राबविले आहेत. दरम्यान, उपचार करताना रक्ताची गरज मोठ्या प्रमाणावर भासू लागल्याने रक्तदान शिबिर घेतल्याचे आयोजकांनी सांगितले. याप्रसंगी विविध प्रकारची माहितीपत्रके, पुस्तिका प्रसिद्ध करण्यात आल्या असून, त्याचे नागरिकांमध्ये वाटप करण्यात आले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट

SCROLL FOR NEXT