Satara Latest Marathi News 
सातारा

धोकादायक! विहे घाटात ब्रिटिशकालीन पुलाला भगदाड; तीव्र वळणावरील संरक्षक कठडेही तुटले

विलास माने

मल्हारपेठ (जि. सातारा) : विहे घाटातील तीव्र वळणावर तुटलेल्या संरक्षण कठड्याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. रस्ता रुंदीकरणात नव्या पुलांची कामे पूर्ण झाली. मात्र, ब्रिटिशकालीन पुलाच्या दुरुस्तीचे भिजत घोंगडे कायम आहे. 

बहुचर्चित कऱ्हाड-चिपळूण रस्ता रुंदीकरणाच्या कामाला गेल्या दोन वर्षांपासून सुरुवात झाली असली तरी या कामात असणाऱ्या त्रुटी आणि कामातील हलगर्जीपणामुळे मार्गावर असणाऱ्या गावांच्या समस्या सुटता सुटेनात. रस्ता रुंदीकरणाच्या कामात विहे घाटातील अनेक तीव्र वळणे आणि चढ-उतारावर असणाऱ्या समस्यांवर अजून तरी उपाय सापडलेला दिसत नाही. ब्रिटिशकालीन पुलाला खालून भगदाड पडले आहे. वळणावरील संरक्षक कठडा तुटून धोका निर्माण झाला आहे. 

सध्या रस्ता रुंदीकरणात अनेक ठिकाणी पुलाची कामे झाली. कऱ्हाड-पाटण रस्ता जवळपास 80 टक्के पूर्ण झाला. मात्र, विहे घाटातील ब्रिटिशकालीन पुलाच्या नवनिर्मितीला अजून मुहूर्त सापडलेला नाही. विहे घाटातील मार्ग जवळजवळ 90 टक्के पूर्ण झाला आहे. ब्रिटिशकालीन पुलाची दुरुस्ती आणि घाट मार्गातील डोंगरातून येणारे पाणी थेट मार्गावरून खाली उताराकडे मार्गावरून जात असल्यामुळे या ठिकाणीही रस्ता कॉंक्रिटीकरणातूनच होणे गरजेचे आहे. घाटातील तुटलेल्या कठड्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT