सातारा

दुचाकीच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी; चिंचणेरातील नऊ जणांवर गुन्हा

प्रवीण जाधव

सातारा : चिंचणेर निंब येथील दोन गटांत झालेल्या मारामारीप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. काल सकाळी साडेनऊच्या सुमारास मानसिंग दामोदर जाधव (वय 35, रा. चिंचणेर वंदन) यांचा उदय उमाकांत जाधव याच्याशी दुचाकीच्या कारणावरून बाचाबाची झाली. त्यामुळे उदय जाधव, रमेश विलास जाधव, सुशांत रमेश जाधव, प्रशांत रमेश जाधव, शरद विलास जाधव (सर्व रा. चिंचणेर वंदन) यांनी लाकडी दांडक्‍याने मला व वडील दामोदर यांना मारहाण केली, तसेच चुलत्यांनाही शिवीगाळ करत दमदाटी करत जिवे मारण्याची धमकी दिली, असे मानसिंग यांनी फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार सावंत तपास करत आहेत. 

उदय उमाकांत जाधव (वय 40, रा. चिंचणेर निंब) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मानसिंग जाधव, दामोदर जाधव, शंकर जाधव आणि सुनील जाधव या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गावातील कमानीजवळ मानसिंग यांच्याशी दुचाकी चालवण्यावरून बाचाबाची झाली होती. त्याचा राग मनात धरून संशयितांनी लाकडी दांडके व दगडाने मारून जखमी केले, असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार जाधव तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर दोन्ही गटांतील जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेही मारामारी झाली होती. या प्रकरणीही दहा जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे. 

जिल्हा रुग्णालयातील कक्ष क्रमांक नऊमध्ये जखमींवर उपचार सुरू आहेत. तेथे जमलेल्या दोन्ही बाजूकडील युवकांची काल सायंकाळच्या सुमारास हाणामारी झाली होती. या प्रकरणी मानसिंग दामोदर जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अनिल उमाकांत जाधव, सुधीर शिवाजी जाधव, गणेश विलास जाधव, शरद विलास जाधव, सुशांत उमेश जाधव, प्रशांत रमेश जाधव, जयंत अशोक जाधव, केदार सुरेश जाधव, उदय उमाकांत जाधव, सुनील चंद्रकांत जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार जाधव तपास करत आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लॉन्चपूर्वीच सिक्रेट जगजाहीर! समोर आली Samsung Galaxy A57 अन् A37 स्मार्टफोनची किंमत; पाहा सगळे वेरिएंट एका क्लिकवर

Panchganga river pollution : पंचगंगा नदीत काळेकुट्ट पाणी; ऑक्सिजनअभावी मासे मृत, इचलकरंजीत खळबळ

Ajit Pawar: ''अशोक खरातच्या माध्यमातून अजित पवारांच्या घराबाहेर काळी जादू..'', कुणाचा हात? रोहित पवारांनी सांगितला घटनाक्रम

Monalisa Viral Girl Case : 'व्हायरल गर्ल' मोनालिसाचा चित्रपट दिग्दर्शकावर गंभीर आरोप; म्हणाली, 'सेटवर अनेक वेळा माझ्यासोबत...', मनोरंजन विश्वात उडाली खळबळ

Free AI Courses: गूगल, अ‍ॅमॅझॉसह ह्या ५ कंपन्या देत आहेत फ्री AI शिक्षण; जाणून घ्या कोर्स कुठे आणि कसा करायचा

SCROLL FOR NEXT