सातारा

दारूसाठी पैसे न दिल्याने मुलाकडून पित्याला मारहाण

प्रवीण जाधव

सातारा : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून काल वडिलांना मारहाण करत जखमी केल्याप्रकरणी खोकडवाडी (ता. सातारा) येथील अमोल मदन सावंत (वय 36) याच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

खोकडवाडी येथे मदन अमृत सावंत (वय 72) हे कुटुंबीयांसमवेत राहण्यास आहेत. काल दुपारी साडेचारच्या सुमारास ते शेतात काम करत होते. याठिकाणी त्यांचा मुलगा अमोल हा आला. त्याने वडिलांकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. वडिलांनी दारू पिण्यास पैसे देण्यास नकार दिला. यामुळे चिडलेल्या अमोलने वडील मदन यांच्याशी वाद घातला. वाद घालूनही पैसे मिळत नसल्याने अमोलने वडिलांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण सुरू केली. मारहाण करतानाच त्याने चावा घेऊन वडिलांना जखमी केले. याची तक्रार मदन सावंत यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंदवली असून, अमोल सावंत याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याचा तपास हवालदार जाधव करीत आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : विसर्जन रथामुळे रुग्णवाहिकेला रुग्ण उतरवावा लागला भर चौकात; स्ट्रेचरवरून रुग्णाला नेले ढकलत, शास्त्री रस्त्यावरील घटना

ज्ञानेश कुमार यांच्या IAS मुलीला सुप्रीम कोर्टाने दिलासा देताच वकिलांची असोसिएशन आक्रमक, थेट सरन्यायाधीशांना खुलं पत्र

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून हायटेक सुरक्षा कवच; ‘एआय’ कॅमेरे, ड्रोन आणि अद्ययावत वॉर रूम सज्ज

Vani News : बंदोबस्ताच्या कर्तव्यातही ‘बाप्पां’चा आनंद; पोलिसांनी आजच केले गणरायाचे विसर्जन

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

SCROLL FOR NEXT