Satara Latest Marathi News 
सातारा

सातारा बसस्थानकात करंजेतील युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न; धारदार ब्लेडने स्वत:च्या गळ्यावर केला वार

गिरीश चव्हाण

सातारा : येथील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात काल रात्री करंजे येथील भैरवनाथ कॉलनीत राहणाऱ्या शुभम दीपक भंडारी याने स्वत:चा गळा ब्लेडने कापून घेतला. यामुळे जखमी झालेल्या भंडारी याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

करंजे येथील भैरवनाथ कॉलनीतील सप्तर्षी प्राइडमध्ये शुभम भंडारी हा राहण्यास आहे. तो काल रात्री नऊच्या सुमारास सातारा येथील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात आला होता. या ठिकाणच्या गेट परिसरात आल्यानंतर त्याने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. गोंधळ घालत असतानाच भंडारीने धारदार ब्लेडने स्वत:च्या गळ्यावर वार करून घेण्यास सुरुवात केली. यामुळे त्या परिसरात घबराट पसरली. 

याची माहिती त्याठिकाणी कार्यरत असणाऱ्या वाहतूक कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यांनी रक्‍ताने माखलेल्या भंडारीला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. जखमी भंडारी याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी वाहतूक कर्मचारी दीपक साबळे यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. यानुसार भंडारी याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: मी माफी मागतो...! इंग्लंडच्या स्टार फलंदाजाची आयत्यावेळी माघार, हॅरी ब्रूकनंतर त्याच्यावरही होणार बंदीची कारवाई

Pune News : ‘पीटीपी’ अ‍ॅपमुळे वाहतूक शिस्तीत सुधारणा; अडीच लाख तक्रारींवर ९.३२ कोटींचा दंड

‘कुकडू कू’चा गोंधळ रंगला! ‘सुपर डुपर’चं धमाल गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Chakan News : तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाला मंत्रिमंडळाची मंजुरी; ४२०७ कोटींचा प्रकल्प मार्गी

IPL 2026 Marathi News: चेन्नई सुपर किंग्सच्या गळाला मोठा मासा; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने पाकिस्तान सुपर लीगला मारली 'लाथ'

SCROLL FOR NEXT