Satara Latest Marathi News 
सातारा

झिरपवाडी रुग्णालयाचा निर्णय 'धूळखात'; रामराजेंच्या आदेशानंतरही अंमलबजावणी शून्य

संजय जामदार

कोळकी (जि. सातारा) : फलटण तालुक्‍यासह जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर झिरपवाडी येथील फलटण ग्रामीण रुग्णालय सुरू करण्याची मागणी पुन्हा नागरिकांतून केली जाऊ लागली आहे. वापराविना अनेक वर्षे पडून असलेले हे ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यासंबंधीचा निर्णय सहा महिन्यांपूर्वी रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या उपस्थितीत विधानभवनात आरोग्य विभागामार्फत झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी अद्याप न झाल्याने फलटण तालुक्‍यातील नागरिकांत प्रचंड नाराजी वाढली आहे. 

जुन्या, वापरात नसलेल्या या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीत जनता, सार्वजनिक संस्था भागीदारी तत्त्वावर (पब्लिक प्रायव्हेट पार्टीसिपेशन) कोविड तसेच इतर संसर्गजन्य आजारासाठी रुग्णालय सुरू करण्याबाबतचा विधानभवनात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला होता. मात्र, अद्याप दुरुस्तीचे काम सुरू झालेले नाही. त्यावेळी बैठकीस आरोग्यमंत्री राजेश टोपे, आमदार दीपक चव्हाण, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, राष्ट्रीय आरोग्य अभियान आयुक्त एन. रामास्वामी, आरोग्यसेवा संचालनालय संचालिका डॉ. तायडे, फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, सातारचे जिल्हा शल्यचिकित्सक उपस्थित होते. 

फलटण तालुक्‍यात सध्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यापुढे तर भयानक स्थिती निर्माण होऊ शकते. फलटण येथील शेतीशाळा, जुने लेडिज होस्टेल, जुने मिनार हॉटेल, बाहुली शाळा ही ठिकाणे शासनाने त्यावेळी अधिग्रहित केली होती. परंतु, अखेर या ठिकाणी बेड अपुरे पडू लागल्याने फलटणमधीलच काही खासगी दवाखाने शासनाने ताब्यात घेतले होते. एक नामांकित हॉस्पिटल अधिग्रहित करण्यावरून वादही निर्माण झाला होता व ते हॉस्पिटल शासनाने सील केले होते. शासनाचे स्वतःचे झिरपवाडीतील ग्रामीण रुग्णालय केवळ वापराविना पडून असून शासन खासगी दवाखान्यांच्या मागे लागत असल्याने त्यावेळी तालुक्‍यातील नागरिकांनी आश्‍चर्य व्यक्त केले होते. फलटणच्या काही दवाखान्यांनी आपले काही बेड कोरोना रुग्णांसाठी दिले आहेत. मात्र, त्या दवाखान्यात येणाऱ्या इतर रुग्णांना कोरोना होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. 

महाराष्ट्र शासनाने फलटण तालुक्‍यातील जनतेच्या आरोग्याबरोबर चालवलेला खेळ त्वरित थांबवून झिरपवाडी ग्रामीण रुग्णालय लवकर सुरू करावे, अन्यथा जनआंदोलन उभे करावे लागेल.'' 

-दशरथ फुले, सामाजिक कार्यकर्ते, फलटण 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : ठाकरे मेळाव्यावर मुनगंटीवारांची स्पष्टोक्ती

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT