सातारा

जिल्ह्यात 485 जणांनी नाकारले स्वस्त धान्य; समाजातील गरजूंना होणार लाभ

संजय साळुंखे

सातारा : राष्ट्रीय सुरक्षा योजनेंतर्गत जिल्ह्यात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेत दर महिन्याला स्वस्त दरात धान्याचे वाटप केले जाते. मात्र, जिल्ह्यातील 485 लाभार्थ्यांनी स्वस्त धान्याचे अनुदान नाकारल्याने त्याचा लाभ समाजातील गरजू घटकांना होणार आहे. 

राष्ट्रीय सुरक्षा योजनेंतर्गत केशरी व पिवळ्या शिधापत्रिकाधारकांना विविध सवलतीत धान्याचे वाटप केले जाते. त्यामध्ये रेशनवरील धान्याची गरज नसलेल्या कार्डधारकांनी सवलतीच्या दरातील अन्नधान्य नाकारण्याचा पर्याय सरकारने उपलब्ध करून दिला आहे. त्यासाठी रेशन कार्डधारकांनी "रेशन धान्यातून बाहेर पडा' अशी एक योजना सुरू केली. या योजनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील पिवळी व केशरी कार्डधारकांनी पांढरी शिधापत्रिका करून घेण्यास पुढे आले आहेत. 

या योजनेबाबत सर्व सूचना रेशन दुकानदारांना देण्यात आल्या आहेत. ज्या नागरिकांना रेशन कार्डवरील स्वस्त धान्य नाकारायचे असेल त्यांनी जवळील रेशन दुकानदाराशी संपर्क करण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देऊन बहुतांश नागरिकांनी स्वस्त धान्य नाकारण्याचा पर्याय स्वीकारलेला आहे. या योजनेबाबत तालुका पुरवठा निरीक्षक संतोष दळवी यांनी जनजागृती केली आहे. जिल्ह्यात अनेक नोकरदार, व्यावसायिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे नागरिक केशरी व पिवळी शिधापत्रिका बाळगून होते. मात्र, प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत बहुतांश नागरिक स्वस्त धान्य अनुदान सोडण्यासाठी पुढे येत आहेत. 

आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या नागरिकांनी स्वस्त धान्याचे अनुदान सोडण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 
-आशा होळकर, तहसीलदार, सातारा 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: भारताविरुद्ध शाय होपच्या नाबाद १६२ धावांनी मोडला ३७ वर्षांचा रेकॉर्ड; रोहित-डिव्हिलियर्सलाही टाकले मागे

IND vs WI,3rd ODI: शाय होपचं दीडशतक अन् वेस्ट इंडिजचा सर्वात मोठा विजय; मात्र भारताने जिंकली मालिका

PM झालो तर काय करेन? संजय दत्तचं मुन्नाभाई स्टाईलने उत्तर, ट्रम्प यांना म्हणाला...'मामू, तुम भटक गए हो' पंतप्रधान मोदींवरही टोलेबाजी

IND vs WI, 3rd ODI मध्ये ड्रामा! गुरनूर ब्रार ओव्हर अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला, तर रुदरफोर्डच्या विकेटवरूनही वाद

Beed News : येत्या आठवड्यात कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक बीडच्या कारागृहात येणार; वादग्रस्त 'कॉल रेकॉर्डिंग' अन् अवैध कारभाराची स्वतः करणार झाडाझडती

SCROLL FOR NEXT