Satara Latest Marathi News 
सातारा

स्टेट बॅंकेने ग्राहकसेवेत सुधारणा करावी, अन्यथा गंभीर परिणाम; ग्राहक पंचायतीचा इशारा

आयाज मुल्ला

वडूज (जि. सातारा) : भारतीय स्टेट बॅंकेच्या येथील शाखेतील कामकाजाबद्दल ग्राहकांत अनेक तक्रारी असून, बॅंकेत ग्राहकांना योग्य वागणूक दिली जात नाही. बॅंक प्रशासनाने ग्राहकसेवेत सुधारणा करावी, अन्यथा ग्राहक पंचायतीच्या वतीने गंभीर दखल घेतली जाईल, असे अखिल ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील यांनी सांगितले. 

ग्राहक पंचायतीच्या जिल्हा बैठकीत जिल्हाध्यक्ष श्री. पाटील बोलत होते. स्टेट बॅंकेच्या वडूज, वाई शाखेतील कामाबाबत, तसेच ग्राहकांना मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीबद्दल तक्रारी मांडण्यात आल्या, तसेच बॅंक व्यवस्थापनाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी केली. 

श्री. पाटील यांनी वीज मंडळ, बॅंकेचे व्यवहार, सदस्य नोंदणी, ग्राहक न्यायालयात करावयाचा अर्ज, प्रवासी दिन याविषयी मार्गदर्शन केले. जिल्हा संघटक जयदीप ठुसे यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा सचिव प्रा. नागनाथ स्वामी यांनी आभार मानले. बैठकीस उपाध्यक्ष प्रल्हाद कदम, कोषाध्यक्ष विजेंद्र शिंदे, शुभदा नागपूरकर, तसेच जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष, संघटक व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur politics : मतदार यादीतील गोंधळ, सुनावणी पुढे ढकलली… महापालिका निवडणुकीवर अनिश्चिततेचे ढग; इच्छुकांमध्ये चिंता वाढली

Latest Marathi News Live Update: वर्सोवा बीच परिसरात महिलेला धमकी; आरोपीकडून पिस्तुल–काडतूसांसह घातक शस्त्रसाठा जप्त

Mumbai News: वाय-फाय, चार्जिंग, कॅफे, सोफा… मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर विमानतळासारखे डिजिटल लाउंज उभारणार, कधी सुरू होणार?

Kolhapur Politics : दिवसा नियोजन, रात्री जोडण्या; चंदगडच्या गल्लीगल्लीत निवडणूक तापवणारी गुप्त राजकीय व्यूहरचना!

SMAT 2025: T20 सामन्यात सुपर ओव्हरचा ड्रामा! अभिषेक शर्मा गोल्डन डकवर बाद, CSK च्या गोलंदाजांनं दोनदा धाडलं माघारी

SCROLL FOR NEXT