Satara Latest Marathi News 
सातारा

कोरोना चाचणी केल्यासच कऱ्हाड पालिकेत प्रवेश; मुख्याधिकारी डाकेंचा सक्त आदेश

हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : पालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह नगरसेवकांना कोरोनाची चाचणी सक्तीची आहे. ती तपासणी करणार नाही, त्यांना पालिकेत प्रवेश दिला जाणार नाही, असे आदेश पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी आज दिले. उद्या (मंगळवारी) पालिकेतील अधिकारी व नगरसेवकांसह नागरिकांना कोरोना चाचणी करून घेण्यासाठी दोन ठिकाणी स्वॅब टेस्टची, तर चार ठिकाणी लसीकरणाची सुविधाही पालिकेने केली आहे. 

शहरातील 45 वर्षांवरील सगळ्यांचेच लसीकरण होणार आहे. त्यासाठी त्वरित शहरात कालपासून तीन लसीकरण केंद्रे उभारली होती. त्यात आणखी एक केंद्र वाढवले आहे. स्वॅब टेस्टसाठी दोन ठिकाणी सोय केली आहे, अशी माहिती मुख्याधिकारी डाके यांनी दिली. शहरात 76 ऍक्‍टिव्ह कोरोनाबाधित रुग्ण आहेत. कोरोनावर नियंत्रण यावे, यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरणासह कोरोनाची तपासणी मोहीम पालिकेने हाती घेतली आहे. त्यासाठी शहरातील 45 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण केले जाणार आहे. ते पूर्ण करण्यासाठी शहरात चार ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. पालिकेच्या इमारतीसह नागरी आरोग्य केंद्राशिवाय त्रिशंकू भाग, कार्वे नाका, बैलबाजार रोड भाग, कोल्हापूर नाका, भेदा चौक परिसरात लसीकरण केंद्रे होणार आहेत. 

शहरात कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी पालिका व नागरी आरोग्य केंद्र प्रयत्नशील आहेत. त्याचाच भाग म्हणून पालिका अधिकारी, नगरसेवक व कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी सक्तीची केली आहे. ती न करणारास पालिकेत प्रवेश दिला जाणार नाही. 

-रमाकांत डाके, मुख्याधिकारी 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शासनाची भन्नाट योजना! ३ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या गरजूंना आता न्यायालयातील केससाठी मिळणार मोफत वकील; जन्मदाखला काढण्यासाठीही विनाशुल्क मदत, वाचा....

आजचे राशिभविष्य - 14 ऑगस्ट 2026

आरोग्य स्वातंत्र्य की रोगाचे पारतंत्र्य

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 ऑगस्ट 2026

ढिंग टांग : झुरळांचा झपुर्झा..!

SCROLL FOR NEXT