Satara Latest Marathi News 
सातारा

चिंताजनक! साताऱ्यात आठवडाभरात बाधितांचा आकडा 2 हजार पार; जिल्ह्यात 15 जणांचा मृत्यू

Balkrishna Madhale

सातारा : कोरोनाच्या संसर्गाने मागील काही दिवसातील बाधितांचा आकडा भयावह असून वाढती रुग्णसंख्या धोकादायक आहे. जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात तब्बल दोन हजार 564 बाधित रुग्ण आढळले असून 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सार्वजनिक ठिकाणी नागरिक नियमांचे उल्लंघन करत असल्याने कोरोनाचा फैलाव वाढतच असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या दोन महिन्यापासून कोरोना बाधितांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. जिल्ह्यात काल 472 रुग्ण आढळले असून चार बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या टप्यातील वाढती रुग्णसंख्या चिंताजनक असून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी नियमांचे पालन करण्याची गरज आहे. मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत होता. ऑक्‍टोबरनंतर कोरोनाचे मृत्यू व बाधितांच्या संख्येत घट झाली. मात्र, मागील दोन महिन्यापासून 200 ते 300 च्या जवळपास बाधित रुग्ण आढळत होते. गेल्या आठवड्यापासून 400 च्या टप्यात बाधित रुग्णांची संख्या सापडत असल्याने भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यात कऱ्हाड, फलटण, खंडाळा, वाई ही तालुके हॉट्‌स्पॉट असून या ठिकाणी प्रशासनाने निर्बध कडक केले असून प्रशासन सतर्क झाले आहे.

कोरोना अपडेट्‌स

  • एकूण नमुने : 4,02,154
  • एकूण बाधित : 64,968
  • घरी सोडण्यात आलेले रुग्ण : 59,846
  • मृत्यू : 1,902
  • उपचारार्थ रुग्ण : 3,220

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police Van Accident : पुण्यात धक्कादायक अपघात! पोलीस व्हॅनने उडवल्या ७ गाड्या; CCTV व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : नागपुरात E20 विरोधात गडकरींच्या घरासमोर युवक काॅंग्रेस आक्रमक

Chandrakant Patil: मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये दैवी गुण, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून कौतुक

Pune News: पुणेकरांनो, अजून किती वाट पाहणार? PMRDA चे ३,९०६ कोटींचे प्रकल्प अजूनही रखडले, घोषणा फक्त कागदावरच..

Engineering CAP Result: इंजिनिअरिंग प्रवेशाची पहिली यादी जाहीर; १६ हजार विद्यार्थ्यांना पहिल्याच पसंतीचे कॉलेज! जाणून घ्या महत्त्वाच्या पायऱ्या

SCROLL FOR NEXT