Satara Latest Marathi News 
सातारा

चिंताजनक! वाईत एका दिवसात 70 बाधित; तालुक्‍यात 160 जणांचा मृत्यू

भद्रेश भाटे

वाई (जि. सातारा) : तालुक्‍याबरोबर शहरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून, वाईकरांच्या चिंतेत भर पडली आहे. शहरात मायक्रो प्रतिबंधित क्षेत्र लागू करण्यात आला आहे. जिल्ह्यात केंद्रीय पथक आल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. 

तालुक्‍यात गुरुवारी (ता. 8) 70 पॉझिटिव्ह आले असून, वाई 34 (शहर 26 सह्याद्रीनगर 2, फुलेनगर, शहाबाग 1, एमआयडीसी 4), बावधन 4 (वाघजाईवाडी 1), भुईंज, देगाव, परखंदी येथे प्रत्येकी तीन, वेरुळी, वरखडवाडी, गुळूंब येथे प्रत्येकी दोन, तर वेळे, मेणवली, खोलवडी, कवठे, खानापूर, शिरगाव धोम, धावडी, बोपर्डी, आनवडी, कडेगाव येथे प्रत्येकी एक असे एकूण 70 रुग्ण कोरोनाच्या संसर्गाने पीडित आहेत. 

एक मार्चपासून आजपर्यंत 898 बाधित सापडले असून, उपचार 720 रुग्ण घेत आहेत. कोविडमुळे आतापर्यंत एकूण 160 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. एप्रिलमध्ये आठ दिवसांत 460 रुग्ण सापडले असून, त्यामुळे नागरिकांबरोबर स्थानिक प्रशासनाची चिंता वाढली आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Returns : तब्बल 400 दिवसांनंतर 'माधुरी' परतली! मध्यरात्री 12.40 वाजता 1160 किमीचा प्रवास करून पोहोचली नांदणीत; उपस्थितांना आनंदाश्रू अनावर

Pimpri News : नोकरीपेक्षा आपला व्यवसायच बरा! दोन लाख ४९ हजार जण उद्योग-व्यवसायाकडे वळले

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Italian Style Aloo Paratha: आलू पराठ्याला द्या 'हा' इटालियन ट्विस्ट! चव अशी की रोज हाच पराठा मागाल

आजचे राशिभविष्य - 12 सप्टेंबर 2026

SCROLL FOR NEXT