Satara Latest Marathi News 
सातारा

बॉंबच्या साहाय्याने रानडुकराची शिकार; कोल्हापुरातील तिघांसह पाच जणांवर पाटणात गुन्हा

राजेश पाटील

ढेबेवाडी (जि. सातारा) : बॉंबच्या साहाय्याने रानडुकराची शिकार केल्याप्रकरणी वन विभागाच्या पथकाने कोल्हापूर जिल्ह्यातील तिघांसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला. वाल्मीक पठारावरील रुवलेच्या (ता. पाटण) हद्दीत वन्यजीव विभागाच्या तपासणी नाक्‍याजवळ काल (ता. 29) रात्री हा प्रकार घडला. गुन्हा दाखल झालेल्यात "वन्यजीव'च्या दोन हंगामी वनमजुरांचा समावेश आहे. 

वन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गस्त पथकाने काल रात्री सणबूर- रुवले रस्त्यावरील पाटीलवाडी फाट्यावर तपासणी केलेल्या कारच्या डिकीत ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या गोणीमध्ये रानडुकराचे मांस मिळाले. कारमधील राजाराम गंगाराम गिजे (वय 39) व गणेश सोमा परबते (वय 40, दोघेही रा. नवे पारगाव, ता. हातकणंगले) यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर शिकारीचा प्रकार समोर आला. मारुती निवृत्ती पवार (रा. नवे पारगाव), तुकाराम ज्ञानू साळुंखे (रा. कारळे) या दोघांनाही ताब्यात घेतले, तर त्यांचा आणखी एक साथीदार पसार झाला. या तिघांचाही शिकारीमध्ये सहभाग होता. 

रुवलेच्या हद्दीत वन्यजीव विभागाच्या चेक नाक्‍याजवळील मालकी क्षेत्रातील माती बंधाऱ्यालगत बॉंब ठेऊन शिकार करण्यात आली. त्यासाठी त्यांनी तीन बॉंब तयार करून आणलेले होते. त्यातील एक बॉंब डुकराच्या तोंडात फुटला, तर उर्वरित दोन बॉंब वन विभागाच्या पथकाने जप्त केले आहेत. सहायक वन संरक्षक किरण कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वन क्षेत्रपाल विलास काळे, वनपाल सुभाष राऊत, डी. डी. बोडके, वनरक्षक अमृत पन्हाळे, जयवंत बेंद्रे व वन मजुरांनी कारवाईत भाग घेतला. 

"वन्यजीव'कडून "त्या' वनमजुरांना घरचा रस्ता
 
रानडुकराच्या शिकार प्रकरणाची "वन्यजीव'ने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी वन्यजीवच्या दोन हंगामी वनमजुरांवर गुन्हा दाखल झाल्याने संबंधितांना तातडीने कामावरून कमी केल्याचे सूत्रांनी सांगितले. संबंधित दोघेही हंगामी वनमजूर म्हणून काम करत होते. गुन्ह्यातील त्यांच्या सहभागाविषयी माहिती मिळताच तत्काळ कारवाई केल्याचे सांगण्यात आले. वाल्मीक पठारावर वन्यजीव विभागाचे दोन चेक नाके कार्यरत आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 3rd T20I: इथे-तिथे-सगळीकडे राशिद खान... भन्नाट रन आऊट अन् दोन अविश्वसनीय झेलने फिरवली मॅच; Video Viral

US OPT Fee : अमेरिकेत शिक्षणानंतर नोकरी करण्याचा मार्ग महागणार? द्यावे लागणार एक कोटींचे OPT शुल्क, भारतीय विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम

Eknath Shinde Dare Village : शिवसेना पक्ष-धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दरे गावात दाखल

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् टीम इंडियाचा धावांचा एव्हरेस्ट! संजू सॅमसनची सलग फिफ्टी...

Elderly Doctor Cheated: वृद्ध महिलेच्या देखभालीच्या बहाण्याने दोन कोटींची फसवणूक

SCROLL FOR NEXT