Satara Latest Marathi News 
सातारा

धक्कादायक! फोटोसेशनच्या बहाण्याने दारु पाजून महाविद्यालयीन युवतीशी अश्‍लील चाळे; साताऱ्यात सहा जणांवर गुन्हा

गिरीश चव्हाण

सातारा : केळवली (ता. सातारा) गावच्या हद्दीत युवतीस मद्य पाजून तिच्याशी अश्‍लील चाळे केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यानुसार पोलिसांनी एका अल्पवयीन युवकास ताब्यात घेतले असून, त्याचे इतर साथीदार पसार झाले आहेत. 

सातारा परिसरातील एक युवती मित्रांसमवेत केळवली परिसरात फिरण्यासाठी गेली होती. याठिकाणी तिच्यासोबत असणाऱ्या काही युवकांनी त्या युवतीस मद्य पाजले. मद्य पाजल्यानंतर त्या युवतीसोबत फोटोसेशन करण्याचा बहाणा करत काही युवकांनी अश्‍लील चाळे केले. यास विरोध केल्याने त्या युवतीस सोबतच्या युवकांनी कारमध्ये बसवत मारहाण केली. 

घरी आल्यानंतर युवतीने घडला प्रकार वडिलांना सांगितला. यानंतर त्यांनी याची तक्रार काल सातारा तालुका पोलिस ठाण्यात नोंदवली. यानुसार आज त्या पीडित युवतीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणीमुळे या प्रकरणातील गांभीर्य वाढले असून, त्याबाबत स्वतंत्र गुन्हा नोंदविण्याच्या प्रक्रियेवर रात्री उशिरापर्यंत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा खल सुरू होता.  

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sarpanch News : सरपंचांचे अधिकार संपले?, फडणवीस सरकारचा निर्णय; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांना अधिकार

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा, नवी मुंबईत पहिली कारवाई; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी

Leopard Attack Junnar : औषध फवारणीचा पंप ठरला ढाल; बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दाम्पत्य थोडक्यात बचावले

Marathi News Live Updates : “एकनाथ शिंदे यांना मराठ्यांमध्येच मारामाऱ्या लावून दंगल घडवायची आहे", जरांगे यांचा गंभीर आरोप

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

SCROLL FOR NEXT