सातारा

पर्यावरण संवर्धनासाठी पाचगणीकर एकवटले; सायकल रॅलीतून दिला महत्वपूर्ण संदेश

रविकांत बेलोशे

भिलार (जि. सातारा) : पाचगणी पालिकेच्या वतीने वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरण संवर्धन व संरक्षणासाठी सायकल वापरास प्रोत्साहन देण्यासाठी पालिका कार्यालय ते स्वच्छ भारत पॉइंटपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या सायकल रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 

पर्यावरण रक्षणासह व्यायामाची गरज व त्यातून नागरिकांची जागरूकता व्हावी, पर्यावरणाचा समतोल, वाहतूक कोंडीपासून मुक्तता, आरोग्याची काळजी आदी बाबी लक्षात घेऊन ही रॅली काढण्यात आल्याचे नगराध्यक्षा कऱ्हाडकर यांनी सांगितले. या रॅलीमध्ये नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, नगरसेवक, कर्मचारी, शालेय विद्यार्थी वर्ग स्वतः सायकल घेऊन सहभागी झाला होता. अभियानात मुख्यतः पाच घटकांचे मूल्यमापन होऊन राज्यस्तरावर त्याचा क्रमांक काढण्यात येणार आहे. या अभियानात पाचगणी गिरिस्थान पालिकेला अव्वल कामगिरी बजावण्याची अपेक्षा आहे. अभियानांतर्गत पाचगणी शहरातील हवेची गुणवत्ता तपासणीसाठी शहरांमधील तीन ठिकाणी मान्यताप्राप्त संस्थांकडून 24 तासांच्या हवेचे मोजमाप घेऊन यामध्ये विविध बारा पेरिमीटर तपासले जाणार आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT