सातारा

कऱ्हाडातील भेदा चौकाला क्रांतिसिंहांचे नाव द्या; नगराध्यक्षांकडे 'बळीराजा'ची मागणी

हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : शहरातील भेदा चौकाला क्रांतिसिंह नाना पाटील चौक यांचे नाव देण्यात यावे, त्यासोबतच क्रांतिसिंह नाना पाटील यांचे स्मारकही तेथे उभे करण्यात यावे, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेने केली. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे व उपाध्यक्ष जयवंत पाटील यांना त्याचे निवेदन त्यांनी दिले.
 
निवेदनात म्हटले आहे, की स्वातंत्र्य लढ्यातील सैनिकांची कर्मभूमी म्हणून कऱ्हाडला ओळखले जाते, स्वातंत्र्य लढ्यातील कार्यकर्त्यांनी राज्याचे व देशाचे नेतृत्व करून शहराचा नावलौकिक वाढवला आहे. त्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांचा प्रामुख्याने नामोल्लेख महत्त्वाचा आहे. शहरामध्ये वेगवेगळ्या स्वातंत्र्य सेनानांची स्मारके आहेत. मात्र, कीर्तिवंत क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नाव शहरामध्ये कुठेही नाही. 

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांचे स्मारक आहे. मात्र, येथे ते नाही. त्यामुळे त्यांचे चौकाला नाव देऊन स्मारक करावे, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेने नगराध्यक्षा रोहिणी शिंदे व उपाध्यक्ष जयवंत पाटील यांच्याकडे केली. शहरातील भेदा चौकास क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नाव द्यावे, त्या चौकात नाना पाटील यांचे स्मारक उभे करावे, अशी मागणीही केली आहे. त्याला नगराध्यक्षा शिंदे, उपाध्यक्ष पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शिष्टमंडळात संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, बळीराजा जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, अनिल घराळ, समीर देसाई, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lionel Messi ने इतिहास रचला! वर्ल्ड कपमध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला; पेनल्टी हुकली, पण विक्रमाची संधी साधली...

Argentina vs Austria : ५६ वर्षानंतर चमत्कार झाला... लिओनेल मेस्सीचा World Cup मध्ये दरारा, ९६ वर्षांच्या स्पर्धा इतिहासात तिघांनाच हा पराक्रम जमलाय...

England Squad vs India T20I: भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; वैभव सूर्यवंशीला रोखण्यासाठी २२ वर्षीय ऑलराऊंडरला संधी

LPG Shortage: पुन्हा गॅस संकट! कतारमधील गॅस प्लांटमध्ये भीषण स्फोट; १३ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये भारतीयांचा समावेश

Bajrang Sonawane: बीडमधील खून प्रकरणात खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलावर आरोप, गुन्हा दाखल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT