सातारा

मतदार यादीतील आक्षेपार्ह नावे त्वरित वगळा; सैदापूरच्या उपसरपंचांची प्रशासनाकडे मागणी

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : ज्यांचा सैदापूर ग्रामपंचायतीशी काहीही संबध नाही. जे गावचे रहिवाशी नाहीत, असे 1100 मतदार जे सैदापुरात वास्तव्यास नाहीत, त्यांची नावे मतदार यादीतून वगळावीत, अशी मागणी सैदापूरचे उपसरपंच फत्तेसिंह जाधव यांनी केली आहे. 

याबाबत प्रांताधिकारी, तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. सैदापूरची पंचवार्षिक निवडणूक फेब्रुवारीत आहे. त्या पार्श्वभूमीवर फत्तेसिंह जाधव यांनी निवेदन दिले. निवेदनातील माहिती अशी, ग्रामपंचायत निवडणूक मतदार यादीमधील प्रभाग 1 ते 6 मधील काही मतदार ग्रामपंचायत सैदापुरातील रहिवाशी नसण्याची शक्यता आहे. त्यांचा सैदापूरशी कोणताही संबंध नाही.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदार यादी कार्यक्रम राबवला आहे. त्या कार्यक्रमानुसार 3 व 5 डिसेंबर रोजी आम्ही 1100 हून अधिक आक्षेपार्ह मतदारांची यादी प्रशासनाला दिली होती. सैदापुरातील नागरिकांतर्फे आक्षेपार्ह मतदारांची नावे निवडणूक यादीमधून वगळावीत, अशी मागणी केली होती. त्याकरिता त्यांच्या नावाने नमूना क्र. 7 देत आहोत, तरी या सर्व मतदारांची प्रभाग निहाय चौकशी होऊन सोबत दिलेल्या यादीप्रमाणे त्यातील आक्षेपार्ह मतदारांची शहानिशा करून त्यांची नावे मतदार यादीतून वगळावीत. मतदार यादी करताना काही मतदारांची नावे दोन पेक्षा अधिक प्रभागामध्ये समाविष्ट झाली आहेत. त्यांची नावे मतदार राहत असतील त्याच प्रभागामध्ये यावीत व इतर प्रभागामधील नावे कमी व्हावीत, अशीही मागणी केली आहे. तसेच श्री. जाधव यांनी आक्षेपार्ह मतदान नोंदणीची चौकशी करून त्यावर खात्री करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT