Satara Latest Marathi News, Satara News 
सातारा

पेढ्याच्या भैरोबाला पर्यटनस्थळ करू; आमदार शिवेंद्रसिंहराजेंचे आश्वासन

दिलीपकुमार चिंचकर

सातारा : शाहूपुरीसाठीची नवीन पाणी योजना पूर्णत्वाकडे जात असून, पेढ्याच्या भैरोबा देवस्थानाला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. आगामी काळात शाहूपुरीमध्ये अद्ययावत मंडई, आरोग्य सुविधांच्या उभारणीला प्राधान्य देणार असल्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले. 

शाहूपुरीतील जनतेने नेहमीच साथ दिली असून, शाहूपुरीच्या विकासात आपण कुठेही कमी पडणार नसल्याचे आश्‍वासनही त्यांनी या वेळी दिले. शाहूपुरी ग्रामविकास आघाडीच्या पाठपुराव्यानंतर शिवेंद्रसिंहराजे यांनी शाहूपुरी व परिसरात कोट्यवधींची विकासकामे मंजूर केली होती. या कामांची पूर्तता केल्याबद्दल शाहूपुरी येथे शिवेंद्रसिंहराजे यांच्या उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या हस्ते शाहूपुरी भागातील विविध विकासकामांचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी सातारा पंचायत समिती सभापती सरिता इंदलकर, भारत भोसले, राजेंद्रकुमार मोहिते, दादा बडदरे, संजय शेलार, नवनाथ जाधव, सुहास वहाळकर, शोभा केंडे, नीलम देशमुख, माधवी शेटे, राजेंद्र केंडे, विश्वतेज बालगुडे, आप्पा गोसावी, सुरेश शेटे आदी उपस्थित होते. 

शिवेंद्रसिंहराजे यांनी विकासकामात आम्ही कधी राजकारण केले नाही. यापुढेही शाहूपुरीतील सर्व प्रश्न सोडवण्यास कटिबध्द असल्याचे सांगितले. दरम्यान, शिवेंद्रसिंहराजेंचा शाहूपुरीतील नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. भारत भोसले यांनी शिवेंद्रसिंहराजे यांच्या पुढाकारामुळे शाहूपुरी आणि शहरात झालेल्या विकासकामांची माहिती उपस्थितांना दिली. शोभाताई केंडे यांनी स्वागत केले. मासचे उपाध्यक्ष राजेंद्र मोहिते यांनी आभार मानले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi MPSC Students Protest : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधींचा पाठिंबा; म्हणाले, ‘आश्वासने नकोत, ठोस कारवाई हवी’

Nagpur News : विमानासाठी गेट उघडताना काळाचा घाला! लोखंडी गेट अंगावर कोसळून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू; दुसरा गंभीर

Kaygaon News : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अमळनेर येथे ‘आजी-आजोबा दिन’ उत्साहात साजरा

Velhe News : गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित जलनियोजनाला शासनाची मान्यता; वाजेघर, वांगणी व शिवगंगा खोऱ्यातील सिंचनाला मिळणार गती

MVA Legislative Council : विधानपरिषदेवरून महाविकास आघाडीत एकमत नाही, काँग्रेस, ठाकरे गटात ठिणगी पडली

SCROLL FOR NEXT