Satara Latest Marathi News 
सातारा

'मायणी-पंढरपूर महामार्गावरील वीज वाहिनीचे काम निकृष्ट करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा'

आयाज मुल्ला

वडूज (जि. सातारा) : मायणी (ता. खटाव) येथील लघुदाब भूमिगत वीज वाहिनीचे काम निकृष्ट दर्जाचे करणाऱ्या ठेकेदारास काळ्या यादीत टाकून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी केली आहे. 

याबाबत डॉ. येळगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मायणी-पंढरपूर महामार्गाचे काम सुरू आहे. याठिकाणी वीज वितरण कंपनीच्या वडूज उपविभागातील मायणी शाखेंतर्गत येथील लघुदाब भूमिगत वीज वाहिनीचे काम करण्यात येत आहे. या लघुदाब भूमिगत वीज वाहिनीच्या कामात अनेक त्रुटी आढळून आलेल्या आहेत. त्यासंदर्भात वीज वितरण कंपनीने हे काम करणाऱ्या ठेकेदाराला सूचनादेखील केली आहे. 

मात्र, संबंधित ठेकेदाराने या सूचनेकडे दुर्लक्ष केले आहे. याठिकाणी करण्यात आलेले भूमिगत वीज वाहिनीचे काम दोन वेळा बंद पडले आहे, तसेच संबंधित ठेकेदाराने हे काम अर्धवट सोडले असून, उर्वरित काम करण्यासाठी दुर्लक्षितपणाची भूमिका घेतल्याचे डॉ. येळगावकर यांनी सांगितले. याबाबत संबंधित ठेकेदारास सांगितले असता त्याच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. याबाबत आपण वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती दिली असून, संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याचे डॉ. येळगावकर यांनी सांगितले. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भोर तालुक्यात होणारा संभाव्य अनर्थ भोर पोलिसांनी टाळला

IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक शतक, ८० वर्षात कोणालाही न जमलेला केला पराक्रम! पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व

Skincare Tips: चेहऱ्यासाठी प्रत्येक वेळी घरगुती उपाय नसतात फायदेशीर! जाणून घ्या त्वचातज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला...

SCROLL FOR NEXT