सातारा

माजी उपसरपंचांसह दोघांना निवडणूक लढवण्यास निर्बंध; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

सुहास शिंदे

पुसेसावळी (जि. सातारा) : खटाव तालुक्‍यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या पुसेसावळी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सुरेश उर्फ सूर्यकांत कदम यांच्यासह सचिन कदम, मंगल कदम यांना मागील निवडणुकीत खर्चाचा तपशील सादर न करणे व खोटी कागदपत्रे सादर केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील पाच वर्षांसाठी निवडणूक लढण्यासाठी निर्बंध घातल्याची माहिती ऍड. अभिजित वीर यांनी दिली. 

याबाबत वीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुसेसावळी ग्रामपंचायतीच्या मागील निवडणुकीमध्ये सुरेश शंकरराव कदम, सचिन उत्तम कदम व मंगल अर्जुन कदम हे निवडून आले होते, तर सुरेश कदम हे उपसरपंच म्हणून कारभार पाहत होते. मात्र, निवडून आलेल्या सदस्याने निवडणूक आयोगाला निवडणूक खर्चाचा तपशील वेळेत सादर करणे बंधनकारक असते.

या तिघांनी वेळेत खर्चाचा तपशील निवडणूक आयोगाला वेळेत सादर केला नसल्याने त्यांच्याविरोधात श्रीकांत कदम, रवींद्र कदम यांनी ऍड अभिजित वीर यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेऊन त्यांच्याविरोधात दाद मागितली होती. ऍड. वीर यांनी केलेला युक्तीवाद जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य करून या तिघांना पुढील पाच वर्षांसाठी निवडणूक लढण्यास निर्बंध घातले. ऐन ग्रामपंचायत निवडणूक काळात हा निकाल आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Resolution Controversy : गोकुळ निवडणुकीत पात्र ठराव ४४४८, तर नेत्यांनी दाखल केले तब्बल ७४०४ ठराव, फुगलेला आकडा कुणाचा?

Viral Video: असं कोण वागतं का? वैभव सूर्यवंशीला सराव करताना चेहरा लपवावा लागला... प्रेक्षकांनी नेमकं असं काय केलं?

Tukaram Mundhe Pattern : तुम्ही खाताय ते पनीर खरंच शुद्ध आहे? रत्नागिरीत 127 ठिकाणे छापे, 77 संशयास्पद नमुने जप्त; मुंढे पॅटर्नच्या भीतीने नामांकित कंपन्यांचे एजंट फरार

Gold Rate Today: जुलैच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर कोसळले! महिन्याभरात 17 हजार तर उच्चांकापासून 40 हजारांनी स्वस्त; पाहा ताजा भाव

Nivali Ghat Landslide : निवळी घाटात दरड कोसळली! ओंडका थेट रस्त्यावर आल्याने दुचाकीस्वार जखमी; कोकणात मुसळधार, पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे...

SCROLL FOR NEXT