सातारा

जिल्ह्यातील गरजूंसाठी घरकुल योजना प्रभावीपणे राबविणार : पालकमंत्री पाटील

प्रशांत घाडगे

सातारा : महाआवास अभियानांतर्गत केंद्र व राज्य पुरस्कृत घरकुल योजनेंतर्गत गरजूंना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार घरे उपलब्ध करुन देण्यासाठी अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. तसेच या अभियानांतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरे देऊन जिल्ह्याचे शंभर टक्के उद्दिष्टे पूर्ण करण्याचे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. 

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात महाआवास अभियान-ग्रामीण जिल्हास्तरीय कार्यशाळेचे उद्‌घाटन श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, समाज कल्याण सभापती कल्पना खाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अविनाश फडतरे आदी उपस्थित होते. 

श्री. देसाई म्हणाले, "राज्यात सातारा जिल्हा परिषद विविध योजना राबविण्यात अग्रेसर असते. गरजू व्यक्तींना 2022 पर्यंत घरे देण्याचा शासनाचा मानस आहे. तसेच या योजनेत प्रत्येक गावच्या सरपंचानी सहभाग घ्यावा.'' खासदार पाटील म्हणाले, "अन्न, वस्त्र व निवारा या माणसाच्या मुलभूत गरजासोबत घरकुल व रोजगार निर्मितीवर भर द्यावा. तसेच महाआवास अभियान-ग्रामीण अभियान राबविण्यासाठी योग्य नियोजन करावे.'' जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत गरिबांना घरकुले दिली जाणार असून शासनाने दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांनी सांगितले. प्रास्ताविकात ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अविनाश फडतरे यांनी अभियान कालावधीत करण्यात येणाऱ्या कामांची माहिती दिली. 

गृहकर्जासाठी बॅंकांनी पुढाकार घ्यावा : जिल्हाधिकारी 

घरकुलांसाठी जमिनीबाबत तहसीलदारांसोबत गटविकास अधिकारी यांची बैठक घेऊन प्रश्‍न मार्गी लावला जाईल. शासकीय योजनेतून बांधण्यात येणाऱ्या घरकुलांना गृह कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी बॅंकांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सिंह यांनी केले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Borkhind Samruddhi Highway Interchange : नाशिकला समृद्धी महामार्गाचा थेट फायदा! बोरखिंड इंटरचेंजला मुख्यमंत्र्यांची मंजुरी, 343 कोटींचा निधी जाहीर

BABAR AZAM: शतक झालं नाही, तरी बाबर आझमने इतिहास रचला! ७६ धावांच्या खेळीने विराट-पाँटिंगच्या खास क्लबमध्ये एन्ट्री, नेमका कोणता विक्रम?

“मी जीवन संपवतोय…” ‘नवरा माझा नवसाचा’ फेम अभिनेत्याची खळबळजनक पोस्ट; पोलिसांची धावाधाव

Marathi News Live Updates : कोकणवासियांचा खोळंबा! मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रचंड वाहतूक कोंडी

CM Devendra Fadnavis : एमपीएससी परीक्षेतील गैरप्रकाराबाबत सरकार कठोर; राजकीय पोळी भाजू देणार नाही; सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी

SCROLL FOR NEXT