सातारा

'बाबा मी बरी झालीय, मला घरी यायचंय..' आराध्याची आर्त हाक आजोबांच्या मनाचा ठाव घेऊन गेली!

हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : बाबा आता मी बरी झालीय... तुम्ही कधी येताय... मला घरी यायचंय... या बोबड्या स्वरातील आराध्याची आर्त हाक आजोबांच्या आणि सासवे कुटुंबीयांच्या मनाचा ठाव घेऊन गेली. जेवण झाल्यानंतर उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयामध्ये उपचार सुरू असतानाच मृत्यू झालेल्या आराध्याची घरी येण्याची इच्छा मात्र मृत्यूने पुरीच होऊ दिली नाही. तिन्ही सख्या बहिणींच्या मृत्यूचे आभाळासारखे दुःख सैदापूर (ता. कऱ्हाड) येथील सासवे कुटुंबीयांवर कोसळले आहे. 

सैदापूर येथील आस्था शिवानंद सासवे (वय नऊ), आराध्या शिवानंद सासवे (वय आठ) व आयुषी शिवानंद सासवे (वय तीन) या चिमुकल्या सख्या बहिणींचा अचानक मृत्यू झाला. खेळण्या बागडण्याच्या वयात सासवे कुटुंबातील सख्या तीन चिमुकल्या बहिणींचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातून हळहळ व्यक्त होत आहे. तीनही मुली दुपारी दोन वाजेपर्यंत झोपल्या होत्या. उठल्यानंतर त्यांना पुन्हा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले. रात्री पुन्हा त्यांना त्रास होत असल्याने लहान मुलगी आयुषीला प्रथम उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. आयुषीच्या मृत्यूचे दुःख असतानाच मोठी मुलगी आस्था हिला त्रास होऊ लागला. त्यामुळे तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना आराध्यालाही त्रास होऊ लागला. त्यामुळे तिलाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. 

उपचारादरम्यान आस्थाचा मृत्यू झाला. दरम्यान, आराध्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. गुरुवारी सकाळी आराध्याने आजोबांना फोन करून बाबा आता मी बरी झालीय, तुम्ही कधी येणार, मला घरी यायचंय, अशी सांगितले. त्यांचाही जीव राहिला नाही. त्यासाठी शिवानंद सासवे आणि त्यांचे वडील लगेच आराध्याच्या भेटीसाठी हॉस्पिटलला निघाले. त्याच वेळी हॉस्पिटलच्या दारात असतानाच शिवानंद सासवे यांना त्यांच्या भावाने आराध्या गेली असे फोनवरून सांगितले. त्यामुळे ते निःशब्द झाले. त्यांनी त्यांच्या वडिलांना ही माहिती दिल्यावर तेही दुःखी झाले. मात्र, स्वतःला सावरून ते वडिलांनी घरी घेऊन आले. मात्र, त्यांना आराध्याला घरी नेता आले नाही. तिचा मृत्यू आजोबांच्या आणि सासवे कुटुंबीयांच्या जिव्हारी लागला. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT