Satara Latest Marathi News 
सातारा

'जनतेला गुलामगिरीत लोटणारे कृषी कायदे मोदी सरकारने त्वरित मागे घ्यावेत'

विलास खबाले

विंग (जि. सातारा) : केंद्र सरकार भांडवलदारांना धार्जिणे असून, सर्वसामान्य जनतेला गुलामगिरीत लोटणारे आहे. अन्यायकारक तीन कृषी काळे कायदे सरकारने मागे घ्यावेत. वीजबिल विधेयक रद्द करावे. त्या विरोधात योग्य दिशा ठरविण्यासाठी आमदार अरुण लाड यांच्या मार्गदर्शनाखाली पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्याची कुंडल येथे शेतकरी परिषद आयोजित करण्यात आली असून, या परिषदेस जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल भारतीय किसान सभेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष डॉ. उदय नारकर यांनी येथे केले. 

केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी काळे कायदे व वीजबिल विधेयक कायद्याबाबत पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांत जनजागृती व्हावी, या उद्देशाने येथे सहविचार सभा झाली. याप्रसंगी ते बोलत होते. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव सयाजीराव पाटील, बळीराजा शेतकरी संघटना केंद्रीय समिती अध्यक्ष पंजाबराव पाटील, भानुदास वास्के, अशोक यादव, माणिक अवघडे, शंकर ढोणे, आनंदी अवघडे, ऍड. समीर देसाई, ऍड. कृष्णा पाटील, विविध तालुक्‍यांतील पदाधिकारी व शेतकरी याप्रसंगी उपस्थित होते. 

डॉ. नारकर म्हणाले, "सर्व कृषी कायदे चुकीचे व अन्यायकारक असून याप्रश्‍नी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आदोलनास आमचा पाठिंबा आहे.'' रवींद्र खबाले यांनी कर्नाटक आणि तेलगंणा सरकार शेतकऱ्यांना वीज मोफत देते. मग महाराष्ट्र सरकार का देत, नाही असा सवाल उपस्थित केला. अशोक यादव यांनी प्रास्ताविक केले. विविध वक्‍त्यांनी मार्गदर्शन केले. जे. एस. पाटील यांनी आभार मानले.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Dudh Election Date : ‘गोकुळ’च्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला? ऑक्टोबर महिन्यात मतदान, मतमोजणी होणार

पंजाब नॅशनल बँकेच्या तिजोरीत तब्बल १७ कोटी २९ लाख रुपयांच्या बनावट नोटा; मॅनेजरला अटक, तीन कर्मचारीही निलंबित

स्टार प्रवाहच्या 'मी कात टाकली'मध्ये दिसणार नवा चेहरा; कोण आहे हा अभिनेता? नवा प्रोमो चर्चेत; 'ही' मालिका घेणार निरोप

'दातापासून ते चेहऱ्याच्या हावभावापर्यंत; ‘दुआ तर अगदी रणवीरची कॉपीच’ नेटकऱ्यांनी रणवीरचे लहाणपणीचे फोटो काढले शोधून, Photo Viral

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

SCROLL FOR NEXT