Satara Latest Marathi News 
सातारा

मराठवाडी धरणक्षेत्रातील मालदनमध्ये बंधाऱ्याला गळती; ढेबेवाडीत शेतकरी वर्ग चिंतेत

राजेश पाटील

ढेबेवाडी (जि. सातारा) : ज्याच्या भरवशावर बागायती शेती केली जात आहे तोच बंधारा गळतीमुळे रिकामा झाल्याने ढेबेवाडी विभागातील मालदन, गुढेसह त्या परिसरातील शेतकऱ्यांच्या तोंडात अक्षरशः राळे वाळण्याची वेळ आली आहे. पाण्याअभावी पिके वाळत चालल्याने तातडीने बंधाऱ्याची गळती काढून त्यात मराठवाडी व साखरी धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

मराठवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात दहापैकी नऊ बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली असून, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मराठवाडीसह साखरी धरणातून त्यात पाणी सोडण्यात येते. याच पाण्याच्या भरवशावर परिसरात बागायती क्षेत्रात वाढ झालेली आहे. प्रतिवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर पाटबंधारे विभागाकडून सर्व बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेटा काढून हिवाळ्यात डिसेंबरच्या दरम्यान त्या पुन्हा बसविण्यात येतात. यावर्षीही त्यांनी अशी कार्यवाही केलेली असली, तरी मालदन येथील बंधाऱ्याच्या प्लेटमधून गळती सुरू असल्याने पाणी वाहून बंधारा लगेच रिकामा होत आहे. 

या हंगामात 21 फेब्रुवारीला मराठवाडी धरणातून तिसरे आवर्तन सुरू झाले; परंतु मालदन येथील बंधारा गळतीमुळे आठवड्यातच मोकळा झाला आहे. गुढे, मालदन, ढेबेवाडी, जाधववाडी, पाचुपतेवाडी या परिसरातील शेतकऱ्यांना बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग होतो. बंधारा रिकामा झाल्याने नदीपात्रात ठिकठिकाणी डबकी साचली असून, शेती पंप उघडे पडले आहेत. पिके वाळत चालल्याने शेतकऱ्यांत काळजीचे वातावरण असून, पाटबंधारे विभागाने तातडीने बंधाऱ्यांची गळती काढून धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन करावे, अशी मागणी गुढेतील प्रवीण पाटील व अन्य शेतकऱ्यांनी केली आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT