सातारा

रस्त्यांचा सांधा करतोय वांदा; पंढरपूर-मल्हारपेठ मार्गावरील मायणीत रोज पंधरा अपघात

संजय जगताप

मायणी (जि. सातारा) : येथील मल्हारपेठ रोडवरील शिक्षण संकुलाच्या प्रवेशद्वारालगत रोज दहा ते 15 अपघात होत आहेत. कॉंक्रिटचा रस्ता आणि डांबरी रस्त्यातील सांधा न जुळल्याने अपघात होत असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. 

पंढरपूर- मल्हारपेठ राज्यमार्गाचे काम सुरू आहे. चांदणी चौकातून मल्हारपेठकडे जाणाऱ्या रस्त्याचे मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळ शिक्षण संकुलाच्या प्रवेशद्वारापर्यंत सिमेंट कॉंक्रिटीकरण केले आहे. त्यापुढे डांबरीकरण करण्यात आले आहे. कॉंक्रिट व डांबरी रस्त्याच्या दरम्यानचा सांधा व्यवस्थित व समान पातळीत जुळलेला नाही. दोन्ही बाजूकडे चांगला रस्ता असल्याने वाहने भरधाव वेगाने येतात. अनेक चालकांना रस्त्याच्या सांध्याची कल्पना नसल्याने वाहने वेगात येऊन तेथे आदळतात. अनेकांना वाहने नियंत्रित करता येत नसल्याने ती नाल्यात पडतात. त्यामुळे अनेकांना इजा झाल्यात. वाहनांचेही नुकसान होत आहे. 

याबाबत रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारास माहिती देण्यात आली. माजी सरपंच आप्पासाहेब देशमुख यांनी सुपरवायझरला रस्त्यावर उभे राहून कसे अपघात घडत आहेत, याचा प्रत्यक्ष अनुभव दिला. दुरुस्त करून घेतो, असे सांगून आता महिना झाला तरीही संबंधिताने दोन रस्त्यामधील सांधा जुळवून घेतलेला नाही. दोन्ही बाजूंनी रस्ता चांगला असल्याने वाहने वेगात येतात. अचानक रस्त्यावरील त्या खड्ड्यात आदळ आपट होऊन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून दररोज अपघात होत आहेत, अशी तक्रार मेडिकल कॉलेजचे उपाध्यक्ष दीपकराव देशमुख यांनी केली. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO PF Withdrawal : पीएफ काढणाऱ्यांसाठी खुशखबर! आता २४ तासांत मिळणार पैसे, EPFOचा मोठा निर्णय

Pune News: नोकरी नाही, घरही विकले! पिंपरीतील हृदयद्रावक घटना; पती, पत्नी आणि मुलीचा मृत्यू, नेमकं काय घडलं..

Latest Marathi News Live Update : मनमानी शुल्क वाढीविरोधात 'अभाविप' आक्रमक; पुण्यात विद्यापीठाबाहेर आंदोलन सुरु

Navi Mumbai: नवी मुंबईतील 'जलद पुनर्विकासा'ला ब्रेक? जनाधार वाढवण्याच्या शिवसेनेच्या प्रयत्नांना भाजपचा कायदेशीर सुरुंग

Nanded News: जनावरांचे दूधवाढीच्या नावाखाली फसवणूक, साडेचौदा लाख रुपयांचा ‘दुधारू गोल्ड’ जप्त

SCROLL FOR NEXT