सातारा

कऱ्हाडला बाजारपेठेत दोन गटांत तुफान राडा; मारामारीत युवक जखमी

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : येथील मोमीन मोहल्ला परिसरात सोमवारी सायंकाळी दोन गटांत राडा झाला. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. दोन्ही गट समोरासमोर होते. त्या वेळी तेथे पोचलेल्या पोलिसांनी त्यांना हटकले. मारामारीत मोमीन मोहल्ला परिसरातील युवक जखमी आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्री उशिरापर्यंत पोलिसात त्यांची नोंद घेण्याचे काम सुरू होते. मारामारी का झाली, त्याचे कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकले नव्हते. मोमीन मोहल्ला व शुक्रवार पेठ परिसरात तणावाचे वातावरण होते. 

सोमवारी सायंकाळी मुख्य बाजारपेठेत झालेल्या राड्यामुळे तणावात भर पडली. मोमीन मोहल्ला परिसरात सायंकाळी राडा झाला. बॅंक ऑफ इंडियाच्या गेटसमोर मोमीन मोहल्ला येथील काही युवक थांबले होते. त्या वेळी तेथे शुक्रवार पेठेतील युवक आले. त्या दोन्ही गटांनी एकमेकांकडे पाहिले. एकमेकांकडे बघण्यावरून त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्यातून वाद वाढला. त्यांच्यात धराधरीही झाली. त्याचवेळी मोमीन मोहल्ला परिसरातून काही युवक धावत आले. बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेपासून शुक्रवार पेठेकडे जाणाऱ्या रस्त्याकडे काही युवक धावले. तेथे तिघे जण एकाला मारहाण करत होते. ते पाहताच आरडाओरडा झाला. तो सारा प्रकार मुख्य बाजारपेठेत सुरू असल्याने तेथेही गर्दी जमली होती. काही लोकांनी त्याची त्वरित माहिती पोलिसांना कळवली. 

पोलिसांना माहिती कळताच काही क्षणात ठाण्यातून मोठे वाहन सायरन वाजवत पोलिस घटनास्थळी पोचले. पोलिस पोचताच मारहाण करणारे तेथून शुक्रवार पेठेच्या दिशेने पळून गेले. मारामारीमुळे मुख्य बाजारपेठेत झालेली गर्दी पोलिसांना हटवली. मात्र, मारहाण करणारे कोण होते, त्याची माहिती त्यांना घेता आली नाही. उशिरापर्यंत त्या भागात तणावाचे वातावरण होते. ज्यांना मारहाण झाली. त्याचे काही मित्रही तेथे जमले होते. त्यांनाही पोलिसांनी जाण्यास सांगितले. सायंकाळनंतर तेथे बंदोबस्त वाढवला होता. मारामारीतील जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याबाबत पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता. पोलिसांनी त्या घटनेची नोंद घेतली होती. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''मोदींमार्फत अल्लाने सगळं दिलंय, कुणाची मदत नको'' अपंग असलेल्या मुस्लिम व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल

माेठी बातमी! 'सातारा जिल्ह्यातील आमदार आठ महिने निधीविनाच'; फंडातील विविध कामांना ब्रेक, अधिवेशनात घोषणेची शक्यता

Viral Video: नवरा फोनमध्ये व्यस्त, पत्नी संतापली, रागात असं काही केलं की...; व्हिडिओच व्हायरल झाला, पाहा पोस्ट

Ashadhi Wari 2025: मृदंगाच्या थापाने वाढविली वारकऱ्यांची ऊर्जा; घळाटवाडीच्या गणेश महाराजांची पंढरीच्या वारीत वादनसेवा

Tata Group: टाटा ग्रुपच्या कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी घसरला; ब्रोकरेजनेही दिला अलर्ट, गुंतवणूकदार चिंतेत

SCROLL FOR NEXT