Satara Latest Marathi News 
सातारा

कऱ्हाडात धुळोबा डोंगरावरची वृक्षसंपदा जळून खाक; ठिबक सिंचनासह झाडांचे मोठे नुकसान

हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : धुळोबा डोंगरास काल रात्री अज्ञातांनी वणवा लावला. त्यात त्या परिसरात वृक्षसंगोपनासाठी करण्यात आलेले ठिबक सिंचनासह वृक्षसंपदा जळून मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे वृक्षप्रेमीतून संताप व्यक्त होत आहे. वन विभागाने संबंधिताचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करावी, अशीही मागणी शिवराय ट्रेकिंग ग्रुप व सह्याद्री प्रतिष्ठानने केली आहे. 

घारेवाडीच्या श्री धुळोबा डोंगर परिसर हिरवागार करण्यासाठी कऱ्हाडमधील शिवराय ट्रेकिंग ग्रुप व सह्याद्री प्रतिष्ठान, सदाशिवगड माळवा प्रतिष्ठानने मोठे परिश्रम घेतले. त्याचबरोबर मध्यंतरी तेथील श्री शंभूमहादेव मंदिराचा मागील वर्षी जीर्णोद्धार केला आहे. मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी मागील वर्षी पावसाळ्यात मंदिर परिसरात वृक्ष लागवड केली होती. 

या वृक्षांना नियमितपणे पाणी मिळावे, यासाठी मागील महिन्यात सह्याद्री प्रतिष्ठान आणि सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानच्या माध्यमातून ठिबक सिंचन केले होते. मात्र, काल रात्री धुळोबा डोंगरास अज्ञात व्यक्तींनी वणवा लावला. यात ठिबक सिंचनासह वृक्षसंपदा मोठ्या प्रमाणात जळून खाक झाली. त्यामुळे पर्यावरणप्रेमींतून संपात व्यक्त होत आहे. ज्यांनी आग लावली त्याचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शिवराय ट्रेकिंग ग्रुप व सह्याद्री प्रतिष्ठानने केली आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Ram Mandir Donation Scam: राम मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात खळबळजनक प्रकार उघड, कर्मचाऱ्याने घरात शेणाच्या ढिगाऱ्यात लपवले १० लाख रुपये

INDW vs PAKW: T20 World Cup आज रंगणार सर्वात मोठा थरार! भारत-पाकिस्तान मॅच कधी, कुठे आणि कशी पाहायची? वाचा सविस्तर

ना मुलगा ना मुलगी... 'याच्या' नावावर करणार सगळी संपत्ती; गोविंदा यांच्या पत्नीने पॅपराजींसमोर केला खुलासा!

Crime: गेमिंगचा नाद लय बेकार! पैसे कमवण्याच्या नादात रिक्षाचालकाला सव्वाकोटींचा चुना लागला; नेमकं काय घडलं?

Setu Center Row: लोणी काळभोरचे सेतू केंद्र मांजरीला हलविण्याच्या हालचालींना खासदार डॉ. अमोल कोल्हेंचा तीव्र विरोध

SCROLL FOR NEXT